Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitin Gadkari Interview: इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिन खराब होते? नितीन गडकरींचे विरोधकांना प्रत्युत्तर

Nitin Gadkari on Ethenol use: सखोल चाचणीनंतरच ई२० इंधन सादर करण्यात आले आहे. ई१० वर चालणारी सर्व वाहने ई२० साठी पूर्णपणे सुसंगत आहेत. आजपर्यंत, ई२० मुळे इंजिन खराब झाल्याची एकही घटना नोंदवली गेलेली नाही. मारुती सुझुकीसारख्या मोठ्या कंपन्यांनीही याला दुजोरा दिला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 15, 2026 | 12:22 PM
Nitin Gadkari, Ethanol Policy, E20 Petrol, Nikhil Gadkari,

Nitin Gadkari, Ethanol Policy, E20 Petrol, Nikhil Gadkari,

Follow Us
Follow Us:

Nitin Gadkari Interview: देशभरात सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ई-२० पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत असून मायलेज कमी होत असल्याची नागरिकांकडून तक्रार केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने इथेनॉल वापराला समर्थन देत आहेत. ई-२० पेट्रोल वाहनांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा गडकरींकडून केला जात आहे.

अशातच गेल्या काही महिन्यांपासून आपल्या मुलांच्या इथेनॉल व्यवसायाला फायदा व्हावा यासाठीही ते या इथेनॉलच्या धोरणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही केला जात आहे. हितसंबंधांच्या संघर्षाच्या या गंभीर आरोपांना नितीन गडकरी यांनी आता उत्तर दिले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इथेनॉलवरून सुरू असलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. त्यांच्या मुलांच्या व्यवसायात इथेनॉलचा वाटा नगण्य असून, त्यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत.

Sonam Wangchuk: ‘दोन दिवसांत सोनम वांगचुक यांचा मृत्यू…’; 8.5 किलो वजन घटल्याने दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची याचिका

नितीन गडकरी यांना दोन मुले

नितीन गडकरी यांच्या थोरल्या मुलाचे नाव निखिल गडकरी आणि धाकट्या मुलाचे नाव सारंग गडकरी आहे. त्यांचे इथेनॉल आणि साखर कारखान्याचे व्यवसाय प्रामुख्याने सीआयएएन ॲग्रो इंडस्ट्रीज आणि मानस ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्यामार्फत चालवले जातात.

 

त्यांच्यावर १,६०० कोटी रुपयांचे कर्ज

मुलांच्या व्यवसायाशी आपला कोणताही संबंध नाही. इथेनॉलवरील चर्चा सुरू होण्यापूर्वीपासूनच त्यांच्या कुटुंबाचा साखर कारखाना अस्तित्वात असल्याचे सांगितले. त्यांच्या मुलांच्या कंपनीच्या एकूण महसुलात इथेनॉलचा वाटा खूपच कमी आहे. शिवाय, या व्यवसायावर अंदाजे १,६०० कोटी रुपयांचे मोठे कर्जही आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, मी कौटुंबिक व्यवसाय चालवत नाहीत किंवा इथेनॉलची किंमत ठरवण्यात किंवा सरकारी खरेदी प्रक्रियेत माझी कोणतीही भूमिका नाही. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम पेट्रोलियम मंत्रालयामार्फत चालवला जातो आणि त्याची किंमत केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे ठरवली जाते. मी केवळ उसापासून बनवलेल्या इथेनॉलचेच समर्थन करत नाहीत.

Supreme Court Row: न्यायालयातील गोंधळाप्रकरणी प्रबल प्रतापसह दोघे अटकेत; गुन्हा दाखल

इथेनॉल-मिश्रित पेट्रोल नको असेल तर १०० टक्के शुद्ध पेट्रोल खरेदी करू शकतात- नितीन गडकरी

इथेनॉलमुळे गाड्यांचे नुकसान होत असेल तर ज्यांना इथेनॉल-मिश्रित पेट्रोल नको असेल ते १०० टक्के शुद्ध पेट्रोल खरेदी करू शकतात. शुद्ध पेट्रोल खरेदी करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. याचे कारण म्हणजे त्याची किंमत ई-२० पेट्रोलपेक्षा जास्त आहे.

इथेनॉलशिवाय पेट्रोलही खरेदी करता येईल. जनतेच्या चिंता दूर करण्यासाठी कमी इथेनॉल मिश्रित पेट्रोल, म्हणजेच ई-१० पेट्रोल, पुन्हा पंपांवर आणले जाऊ शकते का, असे विचारले असता, गडकरी म्हणाले की,  याची शक्यता कमी आहे.  आम्ही २०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे आणि ई-२० पेट्रोल देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध आहे, त्यामुळे आता मागे फिरण्याचा प्रश्नच नाही.” वेगवेगळ्या मिश्रण पद्धतींच्या पेट्रोलच्या पर्यायाबाबत ते म्हणाले की, हा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे.

सखोल चाचणीनंतरच ई२० इंधन सादर करण्यात आले आहे. ई१० वर चालणारी सर्व वाहने ई२० साठी पूर्णपणे सुसंगत आहेत. आजपर्यंत, ई२० मुळे इंजिन खराब झाल्याची एकही घटना नोंदवली गेलेली नाही. मारुती सुझुकीसारख्या मोठ्या कंपन्यांनीही याला दुजोरा दिला आहे. फ्लेक्स-फ्यूएल वाहने (एफएफव्ही) लवकरच बाजारात उपलब्ध होतील. यासाठी, काही पंपांवर ई८५ (८५% इथेनॉल मिश्रण) पेट्रोल देखील उपलब्ध आहे.

 

Web Title: National news nitin gadkari interview clarification on sons ethanol business allegations cian manas agro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Ethanol Petrol
  • Ethanol Scam
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

E10 Vs E20 Petrol : शाप की वरदान? E 20 च्या वादात सरकारचा नवा निर्णय! पंपावर E 10 ची एन्ट्री, नेमका काय आहे प्लॅन?
1

E10 Vs E20 Petrol : शाप की वरदान? E 20 च्या वादात सरकारचा नवा निर्णय! पंपावर E 10 ची एन्ट्री, नेमका काय आहे प्लॅन?

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा
2

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य
3

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.