Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court News: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे सूचक विधान; हिंसेने नव्हे संवादाने

Supreme Court, of India : कॉकरोच जनता पार्टी (CJP) विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान नोंदवण्यात आली. याचिकेत दिल्लीसह देशातील विविध भागांमध्ये CJPच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांदरम्यान हिंसाचार आणि दगडफेकीचे आरोप करण्यात आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 05, 2026 | 04:10 PM
Supreme Court Senior Citizens Rights, Parents Property Rights Law,

Supreme Court Senior Citizens Rights, Parents Property Rights Law,

Follow Us
Follow Us:
  • सीजेपीच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज
  • सुरक्षा दलांनी शांततापूर्ण आंदोलनांदरम्यान अत्यंत संयम बाळगावा
Supreme Court News: राजधानी दिल्लीसह देशातील काही प्रमुख शहरांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलने झाली. या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. या हिंसाचारामुळे तरुणांच्या मनात सरकारबाबत प्रचंड संतापाची भावना आहे. देशभरात वाढत असलेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाला महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने, लोकशाही व्यवस्थेत तरुणांचा आवाज ऐकणे अत्यावश्यक आहे. आंदोलने हाताळताना संयम, संवाद आणि संवेदनशीलतेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आंदोलकांचे म्हणणे समजून घेणे हीच सर्वात मोठी ताकद आहे. ते आंदोलन का करत आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत, हे आधी समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Nitin Gadkari Deepfake News: नितीन गडकरी यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा! E20 इंधनावरील डीपफेक फोटो हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

यासोबतच सुरक्षा दलांनी शांततापूर्ण आंदोलनांदरम्यान अत्यंत संयम बाळगावा, हिंसक प्रतिसादामुळे परिस्थिती अधिक चिघळू शकते. पण तरुणांना समजावून सांगण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधा असा सल्लाही न्यायालयाने म्हटले.

CJP आंदोलनासंदर्भातील याचिकेवर सुनावणी

ही निरीक्षणे कॉकरोच जनता पार्टी (CJP) विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान नोंदवण्यात आली. याचिकेत दिल्लीसह देशातील विविध भागांमध्ये CJPच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांदरम्यान हिंसाचार आणि दगडफेकीचे आरोप करण्यात आले आहेत. सीजेपीच्या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दिल्ली आणि इतर राज्यांतील विद्यार्थी आंदोलनांशी संबंधित प्रलंबित याचिकांसोबत एकत्रितपणे सुनावणीसाठी जोडण्याचा निर्णय घेतला.

“१५ दिवस उलटले, आयोजकांवर कारवाई का नाही?”

सुनावणीदरम्यान निवृत्त हवाई दल अधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित वकिलांनी आंदोलन आयोजकांच्या जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, राष्ट्रीय राजधानीतील उच्च-सुरक्षा क्षेत्रात गोंधळ घालणारे कथित आयोजक १५ दिवस उलटल्यानंतरही खुलेपणाने माध्यमांमध्ये प्रक्षोभक विधाने करत आहेत. पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, कथित हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या संघटना आणि त्यांच्या नेत्यांवर कारवाई का होत नाही, असा सवालही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला.

देशातील अनेक राज्यांत पावसाचा हाहा: कार; हवामान विभागाने म्हटले, ‘पुढील 2 आठवडे…’

सुरक्षा यंत्रणांवर न्यायालयाचा विश्वास

संयम बाळगण्याचा सल्ला देतानाच सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या निर्णयक्षमतेवर विश्वास व्यक्त केला. जमिनीवरील परिस्थितीचे मूल्यांकन करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुरक्षा यंत्रणांकडे असल्याचे खंडपीठाने नमूद केले. या टप्प्यावर न्यायालय कोणताही हस्तक्षेप करणार नाही. संबंधित यंत्रणांनी कायद्यानुसार कार्यवाही करावी आणि केंद्र सरकारची भूमिका निश्चित तारखेला न्यायालयासमोर मांडली जाईल.

लोकशाही आणि कायदा-सुव्यवस्थेत संतुलनाचा संदेश

या निरीक्षणांमधून सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीतील आंदोलनाचा अधिकार आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी यांच्यात संतुलन राखण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. सुरक्षा राखणे आवश्यक असले तरी तरुणांच्या तक्रारी आणि मागण्यांकडे दुर्लक्ष करणे लोकशाहीच्या हिताचे नसल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. त्यामुळे भविष्यात विद्यार्थी आंदोलने हाताळताना संवाद, संयम आणि जबाबदारी या तत्त्वांना अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: National news supreme court cji surya kant remarks on cjp student protests and delhi police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
1

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
2

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’
3

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.