Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाचा पक्ष-चिन्ह निर्णय आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रता निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने ECI च्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला.

  • By विवेक
Updated On: Sep 17, 2026 | 05:01 PM
‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

Follow Us
Follow Us:
  • ‘शिंदेंना पक्ष-चिन्ह देताना कोणते निकष वापरले?’; सुप्रीम कोर्टाचा ECI ला सवाल
  • नीरज किशन कौल यांचा शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद
  • शिवसेना प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार किंवा बुधवारी होणार
 

शिवसेना पक्ष-चिन्ह वादात सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निर्णयालाही उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जे. बागची आणि न्यायमूर्ती मोहाना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद सुरू आहे.

‘पक्ष-चिन्ह देताना कोणते निकष वापरले?’

सुनावणीदरम्यान न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेबाबत महत्त्वाचा सवाल उपस्थित केला. शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देताना निवडणूक आयोगाने नेमके कोणते निकष वापरले, असा प्रश्न कोर्टाकडून विचारण्यात आला.

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी

यापूर्वीही न्यायालयाने दोन्ही गटांना तटस्थ चिन्हे देण्याचा पर्याय का विचारात घेतला गेला नाही, असा मुद्दा उपस्थित केला होता. न्यायमूर्ती जे. बागची यांनी न्यायालयीन पुनरावलोकनाच्या दृष्टीने संबंधित सर्व पर्यायांचा ‘वाजवी विचार’ झाला होता का, हे तपासण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं.

कौल यांचा शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद

नीरज किशन कौल यांनी शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करताना २०१९ च्या निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीचा संदर्भ दिला. शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या ४० आमदारांच्या बाजूने पडलेली मतं आणि ठाकरे गटाच्या १५ आमदारांच्या बाजूने पडलेली मतं यातील फरक त्यांनी न्यायालयासमोर मांडला. लोकसभा निवडणुकीतही शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना मिळालेल्या मतांचा कौल यांनी उल्लेख केला.

‘ECI आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय वेगळा’

आमदार अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष-चिन्हाचा निर्णय एकमेकांशी जोडण्याच्या प्रयत्नावरही कौल यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाचा निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हे वेगवेगळ्या उद्देशांसाठी घेतले जातात, असा युक्तिवाद त्यांनी केला. ‘सुभाष देसाई’ प्रकरणातील घटनापीठाच्या निर्णयाचा दाखला देत दोन्ही घटनात्मक संस्थांच्या निर्णयांमध्ये सुसंगतता असणं आवश्यक नसल्याचं कौल यांनी मांडलं.

Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्‍य बदलू शकत नाही…’ आदित्‍य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

तसंच निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून निवडणूक प्रक्रियेवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे. त्यामुळे दुसऱ्या घटनात्मक प्राधिकरणाच्या निर्णयाची वाट पाहत आयोगाची कार्यवाही अनिश्चित काळासाठी थांबवता येणार नाही, असंही कौल यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणातील सुनावणी आता पुढील मंगळवार किंवा बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत न्यायालयाकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जातात आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद कोणत्या दिशेने जातो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Shiv sena party symbol case supreme court election commission shinde uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Election Commission
  • shivsena
  • Supreme Court

संबंधित बातम्या

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’
1

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
2

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?
3

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणे बदलली! तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा काँग्रेस-डाव्या आघाडीला फायदा?

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ
4

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.