Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Protest : ‘डिटेन नाही, माझं अपहरण केलंय’ नेहा वोरा यांचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, आंदोलनस्थळी RAF तैनात

Delhi Protest : दिल्लीतील अशोक रोडवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान AISA अध्यक्ष नेहा वोरा यांना पोलिसांनी पुन्हा डिटेन केल्याचा दावा करण्यात आला आहे. नेहा वोरा यांनी एक्सवर पोस्ट करत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

  • By विवेक
Updated On: Oct 04, 2026 | 08:00 PM
Neha Bora Detain

Neha Bora Detain

Follow Us
Follow Us:
  • AISA अध्यक्ष नेहा वोरा यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले.
  • डिटेन करण्याऐवजी अपहरण करून नेल्याचा दावा नेहा वोरा यांनी केला.
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या आंदोलनात RAF जवान तैनात
 

दिल्ली : दिल्लीतील अशोक रोडवर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनादरम्यान AISAच्या अध्यक्ष नेहा वोरा यांना पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. नेहा वोरा यांनी आज (रविवार, 4 ऑकटोबर) आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट करत दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. (Delhi Protest)

दिल्ली पोलीस आपल्याला एका वाहनातून घेऊन जात असून, हे केवळ डिटेंशन नसून आपले अपहरण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजीही त्यांना डिटेन करण्यात आले होते.

Jantar Mantar Protest : आंदोलनात महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन? दिल्ली पोलिसांच्या ACP वरच गंभीर आरोप; क्राईम ब्रांच करणार चौकशी

महिला पोलिस नसल्याचा सोशल मीडियावर दावा

नेहा वोरा यांच्या डिटेंशननंतर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्या वाहनातून त्यांना नेण्यात येत आहे, त्या वाहनात महिला पोलीस कर्मचारी दिसत नसल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. महिला आंदोलकाला ताब्यात घेताना महिला पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे का, तसेच नेहा वोरा यांना पुन्हा ताब्यात घेण्यामागे नेमका काय कायदेशीर आधार आहे, असे सवाल सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.

Where is Delhi Police taking Neha on their own? This is not detention it is kidnapping! https://t.co/dFBBh1EaLa — Neha (@neha_aisa) October 4, 2026

नेहा वोरा यांना पुन्हा डिटेन करण्यामागे कारण काय?

नेहा वोरा यांना दुसऱ्यांदा डिटेन करण्यात आल्याचा दावा झाल्यानंतर या कारवाईच्या कायदेशीर आधारावरही चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी कोणत्या कारणामुळे त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना कुठे नेले जात आहे, याबाबत स्पष्ट माहिती समोर येणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, नेहा वोरा यांच्या पोस्टमधील आरोपांनंतर या प्रकरणात दिल्ली पोलिसांची अधिकृत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

आंदोलनस्थळी RAF जवानांची तैनाती

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची तसेच ACP विवेक भगत यांच्या अटकेची मागणी करत आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला वेग आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स अर्थात RAFचे जवान तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी आंदोलनस्थळी CRPFचे जवान तैनात होते. आंदोलन अधिक तीव्र झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

🚨SOS🚨 AISA President Neha Bora has been picked up by Delhi Police in an unauthorised vehicle, WITHOUT A SINGLE FEMALE CONSTABLE! WE DO NOT KNOW WHERE THEY ARE TAKING THEM! THEIR WHEREABOUTS ARE UNKNOWN! @DelhiPolice has crossed EVERY LIMIT! — AISA (@aisa_official_) October 4, 2026

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आंदोलकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर ACP विवेक भगत यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

दिल्लीतील या आंदोलनादरम्यान पोलिसांची कारवाई, नेहा वोरा यांचे डिटेंशन आणि त्यांच्याकडून करण्यात आलेले गंभीर आरोप यामुळे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.

Janatar Mantar Protest Breaking: ज्ञानेश कुमारांविरोधात राजकारण तापलं! जंतरमंतरवर आज पुन्हा मोठा राडा

Web Title: Neha vora delhi police detention kidnapping delhi protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Delhi Police
  • election commission of india
  • Gyanesh Kumar

संबंधित बातम्या

Jantar Mantar Protest : आंदोलनात महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन? दिल्ली पोलिसांच्या ACP वरच गंभीर आरोप; क्राईम ब्रांच करणार चौकशी
1

Jantar Mantar Protest : आंदोलनात महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन? दिल्ली पोलिसांच्या ACP वरच गंभीर आरोप; क्राईम ब्रांच करणार चौकशी

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात
2

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड
3

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
4

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.