लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर एनडीएच्या (NDA) संसदीय मंडळाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे. यावेळी भाजपला बहुमत मिळवता आले नसल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी टीडीपी आणि जेडीयू तसेच इतर मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. तसेच सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूला कोणती मंत्रिपदं मिळतील यावरूनही राजकीय चर्चा जोरात सुरू आहे. एनडीएच्या बैठकीत नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी 9 जून, संध्याकाळी 6 वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
याशिवाय भाजपने आज दिल्लीत आपल्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी भाजपला उत्तर प्रदेशातून केवळ 33 जागा मिळाल्या असून, हा मोठा धक्का मानला जात आहे. अशा स्थितीत भाजप उत्तर प्रदेशातील संघटनेबाबत काही मोठे निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एक दिवसापूर्वी, यूपी भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे आणि राजीनामा देण्याची ऑफर देखील दिली आहे.
तसेच नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. असे आशा जोशी यांनी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यासाठी जमलेल्या एनडीए नेत्यांना सांगितले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नवनिर्वाचित खासदार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी आणि माजी मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होत आहे. एनडीएचे खासदार, मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहिले असते. बैठकीत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडतील आणि मित्र पक्ष आणि खासदार त्याला मंजुरी देतील अशी शक्यता आहे.






