Prince Yadav : प्रिन्सचा 'पंच', तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड, सौजन्य : आयएएनएस
IND vs NEP : दोहा येथे सुरू असलेल्या ACC Mens Asia Cup Rising Stars मधील पहिल्या सामन्यात भारत ‘ए’ने नेपाळला (IND vs NEP) अवघ्या 26 धावांत गारद केले. लोकांना नेपाळचा संघ छोटा जरी वाटत असला तरी फॉरमेट मोठा होता बॉस. त्यातही नेपाळनं आपला तगडा राष्ट्रीय संघ उतरवलेला. या सामन्यात कर्णधार तिलक वर्मा व कुमार कुशाग्रने दणदणीत शतक ठोकलं असले तरी, प्रिन्स यादवच्या 5 आणि हर्षित राणाच्या 4 विकेट महत्त्वाच्या ठरल्या.
हर्षित राणा (16/4)ने जरी विकेट घेण्याची मुहूर्तमेढ रचली असली तरी प्रिन्स यादवनं त्याची सांगता केली. प्रिन्सच्या गोलंदाजीचं कौतुक यासाठी करावं लागेल की, त्यानं आपला स्पेल कुठेही बदलला नाही. त्याने फक्त आणि फक्त 6 धावा देत 5 विकेट घेतल्या. म्हणजे विकेट पेक्षा फक्त एक धाव जास्त.
प्रिन्सने 5 ओव्हर्स टाकल्या. त्यात त्याने फक्त 6 धावा दिल्या आणि 5 विकेट गळाला लावले. दुर्दैवाने एक अतिरिक्त धाव त्यानं दिली नाही तर 5 धावांत 5 विकेट घेणारा जगातील काही नेमक्या गोलंदाजांमध्ये त्याची वर्णी लागली असती. तरी देखील एक कौतुकास्पद बाब म्हणजे 1.20 ची इकोनॉमी. म्हणजे त्याने प्रत्येक ओव्हर्समध्ये फक्त 1.20 धावा दिल्या. म्हणजे किमान एकच धाव त्याने प्रतिस्पर्धी संघाला करू दिली.
भारतीय क्रिकेटचा इतिहास पाहता हा एकप्रकारचा नवा विक्रमच प्रिन्सच्या नावे रचला गेल्याचं क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे.
IND vs NEP : गौतम गंभीरचा लाडका गोलंदाच चमकला, ‘राणा’जींनी नेपाळच्या पोरांचा घाम काढला
𝗙𝗜𝗙𝗘𝗥 𝗦𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹 🔥 Prince Yadav breathing fire at the moment 👏👏 Nepal are 9 down for 22. Updates ▶️ https://t.co/r7KnQLPzIm #TeamIndia | #INDAvNEP | #RisingStarsAsiaCup https://t.co/rtFYJzmb4t — BCCI (@BCCI) November 20, 2026
असं म्हणतात, इतिहास घडवता येतो, पण तो घडवण्याची क्षमता असायला हवी. असंच काहीसं शुक्रवारी प्रिन्सच्या बाबतीत घडले. डावातील दुसऱ्या व त्याच्या पहिल्याच षटकात त्याने नेपाळचे दोन गडी हाकेच्या अंतरावर माघारी धाडले. दीपक डुमरे (1) व बशीर अहमद हे त्याचे पहिले शिकार ठरले. त्याने बशीरला भोपळाही फोडू दिला नाही. येथूनच सामना रंगतदार झाला, कारण अवघ्या एका धावेवर नेपाळने आपले पहिल्या फळीतील तीन गडी गमावले होते.
IND Vs NEP: नेपाळचा उच्च कोटीचा फालतू खेळ; हर्षित, प्रिन्सने काढली हवा; 306 रन्सने लाजिरवाणा पराभव
प्रिन्स यादवच्या गोलंदाजीतील या सामन्यातील आणखीन एक खासियत म्हणजे त्याने पाच विकेट मिळवल्या, पण त्यातील दिपक डुमरेची विकेट वगळता त्याने इतर चौघांना क्लीन बोल्ड केले. प्रिन्सच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने डुमरेचा झेल टिपला, तर बशीर अहमद, पवन शराफ, प्रतिस जीसी व कर्णधार संदीप लामिचाने यांना प्रिन्सने क्लीन बोल्ड केले. यातील बशिर व लामिचाने यांना प्रिन्सने भोपळाही फोडू दिला नाही.
Ans: प्रिन्स यादवने नेपाळविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 6 धावा देत 5 विकेट घेतल्या.
Ans: प्रिन्स यादवची इकोनॉमी 1.20 इतकी होती.
Ans: प्रिन्स यादवने बशीर अहमद, पवन शराफ, प्रतिस जीसी आणि कर्णधार संदीप लामिछाने यांना क्लीन बोल्ड केले.






