Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bomb Blast प्रकरणात मोठी घडामोड; आरोपी जसीर वाणीची न्यायालयात विशेष मागणी, NIAकडून काटेकोर तपास सुरू

लाल किल्ला कार बॉम्बस्फोट प्रकरणी NIA श्रीनगर येथून जसीर बिलाल वाणीला अटक केली आणि त्याला 10 दिवसांची कोठडी सुनावली. ड्रोनमध्ये बदल करून दहशतवादी हल्ल्यांना तांत्रिक मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 22, 2025 | 09:59 AM
NIA arrested Jasir Bilal Wani in the Red Fort car bomb case and remanded him for 10 days

NIA arrested Jasir Bilal Wani in the Red Fort car bomb case and remanded him for 10 days

Follow Us
Close
Follow Us:
  • लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी जसीर बिलाल वाणीने न्यायालयात वकिलाशी भेटीसाठी याचिका दाखल केली.
  • वाणीवर ड्रोनमध्ये बदल करून दहशतवादी हल्ल्यांना तांत्रिक मदत केल्याचा आरोप.
  • न्यायालयाने जसीर वाणीला १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली असून प्रकरणातील तपास अधिक गतीमान.

Jasir Bilal Wani Arrest : दिल्लीच्या लाल किल्ल्याबाहेर १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोट (Delhi Bomb Blast )प्रकरणात आता एक मोठी आणि लक्षवेधी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक मानल्या जाणाऱ्या दहशतवाद्याने, जसीर बिलाल वाणीने (Jasir Bilal Wani ), एनआयए (NIA) न्यायालयात अर्ज दाखल करून आपल्या वकिलाला एनआयए मुख्यालयात भेटण्याची परवानगी मागितली आहे. या अर्जावर पटियाला हाऊस कोर्टात आज सुनावणी होणार आहे, आणि सर्वांच्या नजरा या निर्णयाकडे लागल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

१० नोव्हेंबर रोजी देशाच्या प्रतीकात्मक वारशाचे केंद्र असलेल्या लाल किल्ल्याबाहेर स्फोटक पदार्थांनी भरलेली कार उडवण्यात आली. या घटनेमुळे राजधानीत मोठी खळबळ उडाली आणि तातडीने राष्ट्रीय तपास संस्था (NIA) या प्रकरणात सहभागी झाली. तपासात अनेक धागे हाती लागल्यानंतर एनआयएने १७ नोव्हेंबरला श्रीनगर येथून आरोपी जसीर बिलाल वाणीला अटक केली. वाणी हा काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील रहिवासी असून त्याचे दहशतवादी गटांशी संबंध असल्याचा दावा एजन्सीकडून करण्यात आला आहे.

हे देखील वाचा  : Terror Threat : काश्मीरमध्ये पुन्हा हल्ल्याची तयारी? दहशतवाद्यांची संख्या तिप्पट, सुरक्षा दल हाय अलर्टवर; गुप्तचरांचा गंभीर इशारा

ड्रोनमध्ये बदल करून दहशतवादाला तांत्रिक मदत?

एनआयएच्या मते जसीर वाणी हा दहशतवादी उमर-उन-नबीचा सक्रिय सह-षड्यंत्रकारी आहे आणि बॉम्बस्फोटाच्या आधी त्याने ड्रोनमध्ये बदल केले होते. या बदललेल्या ड्रोनचा वापर भविष्यातील दहशतवादी हल्ल्यांसाठी करण्याची योजना आखली गेल्याचा संशय आहे. एजन्सीने असा दावा केला आहे की वाणीने रॉकेट तंत्रज्ञान आणि GPS आधारित लक्षवेधी प्रणाली सुधारण्यातही भूमिका बजावली होती.

कोठडी आणि न्यायालयीन प्रक्रिया

अटकेनंतर जसीर वाणीला एनआयएने दिल्लीतील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालय अंजू बजाज चंदना यांच्या समोर हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला पुढील १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली, जेणेकरून तपास अधिक व्यापक आणि तांत्रिक पातळीवर करता येईल. या कोठडीदरम्यान एनआयए तांत्रिक उपकरणे, डिजिटल फूटप्रिंट, संवाद चॅनेल तसेच ड्रोन मॉडिफिकेशन नेटवर्कची चौकशी करणार आहे.

हे देखील वाचा : Indian Tejas fighter jet crashed: दुबईतील ‘तेजस’ विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू

विशेष मागणीने वाढले प्रश्नचिन्ह

कोठडीत असताना जसीर वाणीने न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यात एनआयए मुख्यालयात आपल्या वकिलाला भेटण्याची परवानगी मागितली आहे. सुरक्षा दृष्टीने अशा विनंत्या अत्यंत संवेदनशील मानल्या जातात आणि यावर न्यायालयाचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

संभाव्य सुरक्षा धोका की कायदेशीर हक्क?

सुरक्षा तज्ज्ञांच्या मते अशा विनंत्या संशय वाढवणाऱ्या असतात. तर वकिलांचे म्हणणे आहे की आरोपीला न्याय प्रक्रिया मिळणे हे त्याचे मूलभूत अधिकार आहेत. आजची सुनावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे स्पष्ट आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात जसीर वाणीवर काय आरोप आहेत?

    Ans: ड्रोनमध्ये बदल करून दहशतवादी हल्ल्यांना तांत्रिक मदत केल्याचा आरोप.

  • Que: जसीर वाणीची ताजी मागणी काय आहे?

    Ans: वकिलाला एनआयए मुख्यालयात भेटण्याची परवानगी.

  • Que: न्यायालयाने काय निर्णय दिला?

    Ans: आरोपीला १० दिवसांची एनआयए कोठडी.

Web Title: Nia arrested jasir bilal wani in the red fort car bomb case and remanded him for 10 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • Delhi blast
  • Red Fort
  • Terrorist Attack
  • update news

संबंधित बातम्या

दिल्ली बॉम्बस्फोटाचा आरोपी डॉ. उमरचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आले समोर; थेट तुर्कीमध्ये झाले दहशतवादी ट्रेनिंग?
1

दिल्ली बॉम्बस्फोटाचा आरोपी डॉ. उमरचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आले समोर; थेट तुर्कीमध्ये झाले दहशतवादी ट्रेनिंग?

Delhi Bomb Blast प्रकरणात ‘एनआयए’ची मोठी कारवाई; 4 आरोपींना थेट….; नेमका विषय काय?
2

Delhi Bomb Blast प्रकरणात ‘एनआयए’ची मोठी कारवाई; 4 आरोपींना थेट….; नेमका विषय काय?

PakExposed : ‘लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत…’; माजी PoK पंतप्रधानांच्या VIDEOने उघडल्या पाकिस्तानच्या कटकारस्थानाच्या खिडक्या
3

PakExposed : ‘लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत…’; माजी PoK पंतप्रधानांच्या VIDEOने उघडल्या पाकिस्तानच्या कटकारस्थानाच्या खिडक्या

Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…
4

Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.