दिल्ली बॉम्बस्फोटात एनआयएची कारवाई (फोटो- सोशल मीडिया)
दिल्लीत झालेला बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट
दिल्ली बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे
दिल्लीच्या स्फोटातील 4 आरोपींना अटक
मागील आठवड्यात राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेट्रो स्टेशन परिसरात हा भीषण स्फोट झाला. या हल्ल्याचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. दरम्यान या हल्ल्याचा तपास अत्यंत वेगाने केला जात आहे. संपूर्ण देशभरात छापेमारी केली आहे. या प्रकरणात एनआयएने 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने दिल्ली स्फोटातील 4 प्रमुख आरोपीनया अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 6 वर पोहोचली आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर पटियाला हाऊस कोर्टाच्या प्रोडक्शन ऑर्डरवर एनआयएने 4 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अॅक्शन मोडमध्ये
मागच्या आठवड्यात सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत भीषण स्फोट घडला. यामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आले. संपूर्ण देशभरात वेगाने तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली आहे.
दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपींशी संबंधित असलेल्या टिन जणांना अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी सोशल मिडियाच्या मदतीने मुख्य आरोपच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या कारवाईमुळे या घटनेच्या तपासाला वेग आला आहे.
Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे सोशल मिडियाच्या माध्यमातून मुख्य आरोपी दोन मुख्य आरोपी डॉ. उमर मोहम्मद आणि डॉ. मुझम्मिल यांच्यासारख्याच आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. हे तीन आरोपी सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
लाल किल्ला परिसरामध्ये 10 नोव्हेंबर रोजी भीषण दहशतवादी स्फोट झाला. यामध्ये 15 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. यामध्ये हाय प्रोफाईल डॉक्टरांची दहशतवादी संघटना समोर आली आहे. या घटनेचा मास्टर माईंड उमर नबी असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. तसेच आत्मघाती बॉम्बस्फोटाचे समर्थन करणारा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या नेत्याने थेट या दहशतवाद्याची पाठराखण केल्याचे समोर आले आहे.
Ans: मागच्या आठवड्यात सोमवारी भीषण स्फोट झाला. हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ans: दिल्ली स्फोटातील प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.






