गँगस्टर लॉरेन्सच्या भावाला पकडण्यासाठी मोठी फिल्डींग, NIA आता...
नवी दिल्ली : मोठी बातमी समोर येत आहे. तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोई याच्याविषयी माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) जाहीर केले आहे. अनमोल बिश्नोईच्या विरोधात एनआयएकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
सिद्दिकी यांच्या हत्येशी कनेक्शन
कही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून घेण्यात आली आहे, सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी घेतली. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आकरा आरोपींना अटक केली आहे, दरम्यान या प्रकरणात देखील अनमोल बिश्निई याचं नाव समोर आलं आहे, तो बाबा सिद्दिकी यांच्यावर ज्यांनी गोळीबार केला त्या शुटर्सच्या सातत्यानं संपर्कात होता असं बोललं जात आहे. आता त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
मुंबईत १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी या सात जणांना अटक करण्यात आली आहे. सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई टोळीने घेतली आहे. पंजाब आणि इतर राज्यांतून यात सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एप्रिल महिन्यात अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाळाच्या घटनेत अनमोलबिष्णोईचा समावेश होता. त्यावेळी फेसबुकवर पोस्ट करत त्याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. तसेच पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींना शस्त्रे पुरवल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. याशिवाय अनमोल बिष्णोईवर खंडणीशी संबंधित १८ गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, आता बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात त्याचे नाव पुढे आल्यानंतर एनआयएने त्याचा शोध सुरु केला आहे. मात्र, २०२२ साली तो बनावट पासपोर्टच्या आधारे देश सोडून गेल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. अनमोल बिष्णोईबाबात नागरिकांना काही माहिती मिळाल्यास ती पोलिसांना द्यावी, असं आवाहन एनआयएकडून करण्यात आलं आहे. तसेच त्याची माहिती देणाऱ्यांना १० लाख रुपयांचे बक्षीसही एनआयएने जाहीर केलं आहे.