Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग; दक्षिण भारतातील ‘या’ महिला नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

जर संघटनेने निर्मला सीतारमण यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली, तर त्यांनी यावेळी सादर केलेला अर्थसंकल्प त्यांचा शेवटचा असू शकतो. तसेच, भाजपाच्या इतिहासात एक नवीन विक्रम नोंदवला जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 16, 2025 | 08:58 AM
दक्षिण भारतातून होणार भाजपाचा नवा अध्यक्ष

दक्षिण भारतातून होणार भाजपाचा नवा अध्यक्ष

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक झाली. महाराष्ट्रासह दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर आता भाजपमध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. 14 मार्चपूर्वी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. फेब्रुवारीच्या अखेरीस 18 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.

भाजपच्या प्रक्रियेनुसार, राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक तेव्हाच होऊ शकते जेव्हा देशातील किमान अर्ध्या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले जातात. यावेळी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दक्षिण भारतातील नेत्याच्या नावावर एकमत निर्माण करण्याची योजना आहे. कारण, भाजपचे लक्ष आता दक्षिणेकडील राज्यांवर आहे. 20 वर्षांपासून तिथून कोणीही राष्ट्रीय अध्यक्ष झालेले नाही. दक्षिण भारतातून शेवटचे भाजप अध्यक्ष 2002-2004 दरम्यान व्यंकय्या नायडू (आंध्र प्रदेश) होते. संघ आणि संलग्न संघटनांशीही यावर चर्चा झाली आहे.

सध्याचे राष्ट्रपती पूर्व भारतातील आहेत आणि उपराष्ट्रपती पश्चिम भारतातील आहेत. पंतप्रधान उत्तर भारतातून (वाराणसीचे खासदार) येतात. अशा परिस्थितीत, दक्षिण भारतातील एखाद्या नेत्याला जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

निर्मला सीतारमण यांच्या नावाची चर्चा

सध्या दक्षिणेतील प्रमुख भाजप नेत्यांमध्ये प्रल्हाद जोशी, एल मुरुगन, जी किशन रेड्डी, के अन्नामलाई, के ईश्वरप्पा आणि निर्मला सीतारमण यांचा समावेश आहे. जर संघटनेने निर्मला सीतारमण यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली, तर त्यांनी यावेळी सादर केलेला अर्थसंकल्प त्यांचा शेवटचा असू शकतो. तसेच, भाजपाच्या इतिहासात एक नवीन विक्रम नोंदवला जाईल. भाजपमध्ये आतापर्यंत या पदावर एकाही महिलेची नियुक्ती झालेली नाही.

अशाप्रकारे होते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक

18 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीचा ठराव मंजूर करण्यात आला. यानुसार हे पद रिक्त झाल्यास संसदीय मंडळ पक्षाध्यक्षाची नियुक्ती करू शकणार आहे. याशिवाय पक्षाच्या घटनेच्या कलम १९ मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी काही नियम करण्यात आले आहेत. यानुसार पक्षाच्या राष्ट्रीय परिषद आणि राज्य परिषदांचे सदस्य राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करतात. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने केलेल्या नियमानुसार ही निवडणूक होत आहे.

Web Title: Nirmala sitharaman name may confirm for bjp national president post nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • BJP Politics
  • BJP President Election
  • Nirmala Sitharaman
  • political news

संबंधित बातम्या

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
2

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले
3

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले

BJP Politics : भाजप पक्षसंघटनेतही होणार मोठे फेरबदल; अडवाणी, जोशींना मिळणार डच्चू?
4

BJP Politics : भाजप पक्षसंघटनेतही होणार मोठे फेरबदल; अडवाणी, जोशींना मिळणार डच्चू?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.