Nitin Gadkari flight landing: नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं? जाणून घ्या
अलीकडेच अहमदाबाद विमान क्रॅश झाल्याची घटना घडली होती, ज्यामध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. टेकऑफनंतर अगदी काही क्षणातच विमान क्रॅश झाले, ज्यामध्ये विमानातील 200 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. या घटनेनंतर विमानाशी संबंधित अनेक घटना समोर आल्या. त्यानंतर अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले तर काही विमानांचे इमर्जन्सी लँडिंग देखील करण्यात आले होते. तसेच काही विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं समोर आलं होतं. विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना नितीन गडकरी यांच्याशी संबंधित आहे.
बिहारमधील गया विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या विमानाशी संबंधित घटनांमध्ये आता आणखी एका नव्या घटनेची भर पडली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी विमानाने रांचीला निघाले होते. मात्र अचानक बिहारमधील गया विमानतळावर त्यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. अचानक हवामान बदलले आणि मुसळधार पावासाला सुरुवात झाल्याने दृश्यमानता अतिशय कमी झाली, यामुळे वैमानिंकानी आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. मुसळधार पावासामुळे दृश्यमानता कमी झाली, यामुळेच गडकरी ज्या विमानात बसले होते ते विमान दक्षतेचा उपाय म्हणून बिहारमधील गया विमानतळावर उतरवण्यात आले.
गया विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील गया विमानतळावर गडकरी यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले जाणार आहे, याची माहिती विमानतळ प्रशासनाला ३० मिनिटे आधीच मिळाली होती. त्यामुळे गया विमानतळावरील सर्व अधिकारी व सुरक्षा कर्मचारी सतर्क होते. याशिवाय विमानतळावरील सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.
गया विमानतळ संचालक बंगजित साह यांनी सांगितलं की, विमानतळ परिसरात बांधलेल्या व्हीआयपी प्रतीक्षालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आरामाची व्यवस्था करण्यात आली होती. काही वेळ प्रतिक्षा केल्यानंतर, नितीन गडकरी यांच्यासाठी रांचीहून एक विशेष विमान मागवण्यात आले. या विमानाने नितीन गडकरी रांचीला रवाना झाले. गया विमानतळ प्राधिकरणाने शेअर केलेल्या छायाचित्रात गडकरी विमानतळ परिसरात दिसत आहेत.