Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Shortage : भारताला बसली युद्धाची झळ! LPG गॅसचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

LPG Gas Shortage : आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे व्यावसायिक एलपीजी गॅसच्या निर्माण झालेल्या तुटवड्याला तोंड देण्यासाठी तेल मंत्रालयाने एक विशेष समिती स्थापन केली आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Mar 10, 2026 | 12:31 PM
इंधन तुटवड्याच्या 'त्या' अफवांवर विश्वास ठेऊ नका, देशात पुरेशा प्रमाणात साठा; HPCL कडून स्पष्टीकरण

इंधन तुटवड्याच्या 'त्या' अफवांवर विश्वास ठेऊ नका, देशात पुरेशा प्रमाणात साठा; HPCL कडून स्पष्टीकरण

Follow Us
Follow Us:
  • युद्धाचा भारताच्या तेल आणि गॅसवर परिणाम
  • केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु
  • मंत्रालयाने एक विशेष समिती केली स्थापन
LPG Gas Shortage : नवी दिल्ली : इराण आणि इस्रायल व अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या युद्धाची (Iran Israel War) झळ आता भारतापर्यंत येऊ लागली आहे. इराणने तेल वाहतूक करणारे समुद्री मार्ग बंद केल्यामुळे तेलाचा तुटवडा भासू लागला आहे. याचा थेट परिणाम भारतावर देखील दिसू लागला आहे. घरगुती गॅस सिलेंडर विकत घेताना काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या (LPG Gas) अचानक निर्माण झालेल्या तुटवड्याला तोंड देण्यासाठी तेल मंत्रालयाने एक विशेष समिती स्थापन केली आहे.

 

कच्चे तेलाची आयातीवर परिणाम झाल्यामुळे तेल आणि गॅस वापरावर याचा परिणाम झाला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगात ही कमतरता गंभीर संकट निर्माण करत आहे. उद्योग संघटनांनी इशारा दिला आहे की जर पुरवठा लवकर पूर्ववत झाला नाही तर काही दिवसांतच भोजनालये आणि रेस्टॉरंट्स बंद होऊ शकतात.

हे देखील वाचा : केंद्र सरकारकडून दिलासा; LPG चे उत्पादन वाढवण्याचे दिले आदेश, ‘सर्वसामान्यांना प्राधान्य द्या…

संकट कसे सुरू झाले?

मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे सौदी अरेबियासारख्या देशांमधून भारताच्या ८५-९०% एलपीजी आयातीवर परिणाम झाला आहे. यामुळे सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे, ज्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी व्यावसायिक गॅसची कमतरता वाढत आहे.

या संकटातून बाहेर येण्यासाठी तेल मंत्रालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तेल मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिली आहे. तेल मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी पुरवठ्याशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या तीन कार्यकारी संचालक असलेल्या टास्क फॉर्सची स्थापना करण्यात आली आहे. भारतात दरवर्षी ३.१३ कोटी टन एलपीजीचा वापर होतो. यापैकी ८७% घरगुती स्वयंपाकघरात आणि १३% हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरला जातो. एकूण मागणीपैकी ६२% आयातीद्वारे पूर्ण केली जाते.

सरकारकडून घेतली जात आहे खबरदारी

पेट्रोकेमिकल उत्पादन कमी करून एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश तेल मंत्रालयाने रिफायनरीजना दिले आहेत. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी घरगुती गॅस सिलिंडरसाठी बुकिंग कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच केवायसी असणाऱ्या ग्राहकांना गॅस दिला जाणार आहे. रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक असलेल्या क्षेत्रांसाठी आयात केलेल्या एलपीजीला प्राधान्य दिले जात आहे.

उद्योगावर परिणाम

मीडिया रिपोर्टनुसार, गॅस सेवा पुरवठा खंडित होण्याचा परिणाम मुंबई आणि बेंगळुरूमध्ये आधीच दिसून येत आहे. इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी टंचाई वेगाने पसरत आहे आणि लवकरच संपूर्ण क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा: इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांच्या स्वयंपाकघरावर परिणाम

आजचे एलपीजी सिलिंडरचे दर

व्यावसायिक सिलिंडर –

  • दिल्ली: ₹१८८३ (१९ किलो)
  • कोलकाता: ₹१९९०
  • मुंबई: ₹८३५
  • चेन्नई: ₹२०४३.५०घरगुती सिलिंडर (१४.२ किलो) –
  • दिल्ली: ₹९१३
  • मुंबई: ₹९१२.५०
  • कोलकाता: ₹९३९
  • चेन्नई: ₹९२८.५०

Web Title: Oil ministry sets up task force due to lpg gas shortage iran israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Commercial LPG
  • Iran Israel Conflict
  • LPG Gas
  • LPG gas cylinder

संबंधित बातम्या

नेमकं चाललंय काय? चीन करतंय पोती भरुन सोन्याची खरेदी, सुरु झाले जगावर आर्थिक संकट येण्याचे संकेत?
1

नेमकं चाललंय काय? चीन करतंय पोती भरुन सोन्याची खरेदी, सुरु झाले जगावर आर्थिक संकट येण्याचे संकेत?

पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
2

पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

LPG Subsidized Cylinder : सरकारकडून मोठा खुलासा! ‘या’ कारणासाठी सब्सिडी सिलेंडरची संख्या केली कमी
3

LPG Subsidized Cylinder : सरकारकडून मोठा खुलासा! ‘या’ कारणासाठी सब्सिडी सिलेंडरची संख्या केली कमी

भारतासह चीनी कंपन्या अडचणीत, Russia सोबत संबंधांमुळे तणावात?  युरोपियन युनियनची काय घोषणा?
4

भारतासह चीनी कंपन्या अडचणीत, Russia सोबत संबंधांमुळे तणावात? युरोपियन युनियनची काय घोषणा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.