पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा: इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांच्या स्वयंपाकघरावर परिणाम
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेस्टॉरंट्स आणि खानावळींना १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा कमी पडत असल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ५ मार्चपासून लागू झालेल्या नवीन नियमांनुसार, ग्राहकांना आता मागील डिलिव्हरीनंतर २५ ते ३० दिवसांनीच पुढील सिलिंडर बुक करता येणार आहे. या निर्बंधांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Gairan Lands PMC: राज्यातील ७,८८७ हेक्टर गायरान जमिनी आता सरकारच्या मालकीच्या होणार
३५,००० ग्राहकांना सेवा देणाऱ्या आम्रपाली गॅस एजन्सीमध्ये दररोजचे बुकिंग ८०० वरून थेट १,२०० वर पोहोचले आहे. “लोक भीतीपोटी आगाऊ बुकिंग करण्यासाठी कार्यालयात गर्दी करत आहेत. अनेक ग्राहकांनी नियमित बुकिंग क्रमांकांवर संपर्क होत नाही. वारंवार प्रयत्न करूनही त्यांचे फोन कॉल बुकिंग यशस्वी झाले नाही, अशी तक्रार करत आहेत. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे आगामी काळात गॅसची टंचाई भासेल, या भीतीने पुणेकर आतापासूनच सिलिंडरचा साठा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र दिसत आहे.
५ मार्चपासून अंमलात आलेल्या नवीन नियमांनुसार, घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगवर मर्यादा आणल्या गेल्या आहेत. आता ग्राहकांना त्यांचे पुढील सिलिंडर बुकिंग मागील वितरणापासून (Delivery) केवळ २५ ते ३० दिवसांच्या अंतरानेच करता येणार आहे. या अचानक आलेल्या बदलामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
या संदर्भात बोलताना वितरक कांबळे यांनी सांगितले की, “भविष्यात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होईल, या भीतीने ग्राहक मोठ्या संख्येने कार्यालयात गर्दी करत आहेत आणि आगाऊ (Advance) बुकिंगसाठी प्रयत्न करत आहेत. ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण स्पष्टपणे जाणवत आहे.”
तसेच, “पुरवठादार कंपन्यांकडून घरगुती एलपीजीचा (LPG) साठा आणि पुरवठा सध्या कमी आहे. त्यातच घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या सिलिंडरची मागणी प्रचंड वाढली आहे.” इतकेच नव्हे तर, सरकारच्या ताज्या निर्देशांनुसार सध्या नवीन गॅस जोडण्या (New Gas Connections) देण्याचे कामही थांबवण्यात आले आहे.
बीपीसीएल (BPCL) मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी देशभरातील साठ्यावर लक्ष ठेवून असून घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिले जात आहे. सध्यातरी कोणतीही मोठी समस्या नाही, मात्र व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यातील अडचणी थेट मध्य-पूर्व आशियातील (Middle East) सुरू असलेल्या युद्धाशी संबंधित आहेत. जोपर्यंत हे युद्ध सुरू राहील, तोपर्यंत व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा राहू शकतात.”






