Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Alliance News: निवडणूक आयोगाविरोधात आज इंडिया अलायन्स मैदानात; राहुल गांधींच्या नेतृत्त्वात दिल्लीत विरोधी पक्षांचा मोर्चा

बिहारमधील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)आणि इतर राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक हेराफेरीविरुद्ध विरोधकांचा एकत्रित लढा बळकट करण्यासाठी ही मोर्चा काढला जाणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 11, 2025 | 10:08 AM
India Alliance News: निवडणूक आयोगाविरोधात आज इंडिया अलायन्स मैदानात; राहुल गांधींच्या नेतृत्त्वात दिल्लीत विरोधी पक्षांचा मोर्चा
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक आयोगाविरोधात इंडिया अलायन्सची एकजूट
  • निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आलायन्सचा मोर्चा
  • विशेष सखोल पुनरीक्षण आणि निवडणुकीतील फेरफार विरोधात राहुल गांधींच्या नेतृत्त्वात मोर्चा
India Alliance March: बिहारमधील मतदार यादीतील अनियमितता आणि निवडणुकीत झालेल्या कथित हेराफेरीविरोधात ‘इंडिया’ ब्लॉक सोमवारी आपली ताकद दाखवणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली संसद भवन संकुलापासून दिल्लीतील भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाईल. विरोधी पक्षाचे खासदार एक किलोमीटर चालत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचतील. तसेच, निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी वेळही मागण्यात आल्याचे कळते.

निवडणूक घोटाळ्याच्या दाव्यांवरून निवडणूक आयोगाला रस्त्यांपासून संसदेपर्यंत घेरण्याचा इशारा देण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीचे वरिष्ठ नेते आणि सर्व खासदार सोमवारी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनर्रचनेविरोधात आयोजित केला जात आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडेल. त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्नाटकातील एका जागेवर मतदान चोरीचा आरोप केला होता. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, निवडणूक आयोगाने मतदार यादीतून 65 लाख नावे वगळली, तसेच इतर त्रुटींबाबत कोणतीही माहिती दिली नाही. या पार्श्वभूमीवर, ‘इंडिया’ आघाडीचे नेते आयोगाची भेट घेऊन डिजिटल मतदार यादीसह संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी करणार आहेत.

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

विरोधकांचा मोर्चा आणि रात्रीचे जेवण; निवडणूक हेराफेरीविरोधात रणनीती

बिहारमधील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)आणि इतर राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक हेराफेरीविरुद्ध विरोधकांचा एकत्रित लढा बळकट करण्यासाठी ही मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यां यांनी सोमवारी ‘इंडिया’ आघाडीच्या सर्व खासदारांना रात्रीच्या जेवणाच्या बैठकीसाठी आमंत्रित केल्याची माहिती आहे. या बैठकीत बिहारसह इतर राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या तयारीवर लक्ष ठेवणे, मतदार यादीत होणारे फेरफार आणि मतदान चोरीच्या दाव्यांवर यावेळी चर्चा होणार आहे.

आयोगाकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी दिलेल्या धमकीच्या वृत्तीवरही विचारविनिमय होणार आहे.तसेच, राहुल गांधी यांच्या मतदार यादीतील कथित फेरफार आणि मतदान चोरीच्या दाव्यांवर चर्चा होईल. आयोगाकडून या आरोपांना उत्तर देण्याऐवजी दिलेल्या धमकीच्या वृत्तीवरही विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

होय हे शक्य आहे! महिना 25 हजार कमावणारा सुद्धा विकत घेईल Royal Enfield Hunter 350, असा असेल हिशोब

दरम्यान, संसदेत आतापर्यंत एकजूट असलेले विरोधी पक्ष बिहारमधील विशेष सघन मतदार यादी पुनरावृत्ती आणि कथित निवडणूक हेराफेरीविरोधात सोमवारी सकाळी ११:३० वाजता रस्त्यावर उतरणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद भवन ते निवडणूक आयोगापर्यंत संयुक्त निषेध मोर्चा काढला जाईल.

इंडिया आघाडीने आपल्या मागण्या पुन्हा एकदा मांडण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. पावसाळी अधिवेशनात बिहार सुधारणा विषयावर चर्चा व्हावी, या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून विरोधी पक्ष सतत्याने मागणी करत आहे. मात्र सरकार हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत चर्चेस कऱण्यास तयार नाही. मल्लिकार्जून खर्गे यांच्या रात्रीच्या जेवणाच्या बैठकीत, काँग्रेस मत चोरीविरुद्ध राहुल गांधींच्या मोहिमेत विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करेल. ७ ऑगस्ट रोजी राहुल गांधींच्या ‘डिनर मीटिंग’दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक आयोगाला घेराव घालण्याच्या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते.

 

Web Title: Opposition parties march in delhi today under the leadership of india alliances rahul gandhi against the election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • election commission of india
  • INDIA Alliance
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

MGNREGA चे वीस वर्षांचं काम एका दिवसात उद्ध्वस्त; VB–G RAM G वरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
1

MGNREGA चे वीस वर्षांचं काम एका दिवसात उद्ध्वस्त; VB–G RAM G वरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल
2

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल

Sonia Gandhi case: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधींना दिलासा, कोर्टाकडून ईडीचे आरोपपत्राची दखल घेण्यास नकार
3

Sonia Gandhi case: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधींना दिलासा, कोर्टाकडून ईडीचे आरोपपत्राची दखल घेण्यास नकार

Rahul Gandhi on BJP: काँग्रेसचा ‘वोट चोरी’वर एल्गार! राहुल गांधींचा मोदी-शहांवर हल्ला, म्हणाले- ‘सत्याच्या बळावर त्यांना…’
4

Rahul Gandhi on BJP: काँग्रेसचा ‘वोट चोरी’वर एल्गार! राहुल गांधींचा मोदी-शहांवर हल्ला, म्हणाले- ‘सत्याच्या बळावर त्यांना…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.