Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress AI Video : ही भित्र्या माणसाची लक्षणे…! कॉंग्रेसच्या चीन घुसखोरीच्या AI व्हिडिओने केले पंतप्रधानांना लक्ष्य

चीनी सैन्य घुसखोरी करत असताना सैन्याला योग्य निर्णय दिला नसल्याचा आरोप काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर केला आहे. याच परिस्थितीवर काँग्रेस पक्षाने AI वापरुन व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2026 | 04:55 PM
Congress AI Video Mocks PM Narendra Modi Words in 2020 Ladakh Standoff

Congress AI Video Mocks PM Narendra Modi Words in 2020 Ladakh Standoff

Follow Us
Follow Us:
  • काँग्रेस पक्षाचा AI ने तयार केलेला व्हिडिओ व्हायरल
  • पंतप्रधान मोदींनी निर्णय न घेतल्याचा आरोप
  • नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
Congress AI Video : नवी दिल्ली : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मात्र अर्थसंकल्प त्यातील योजना आणि फायदा-तोटा यावर चर्चा न होता संसदेमध्ये वेगळ्याच मुद्द्यावरुन वातावरण तापले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चीनी सैन्याचे भारतामध्ये घुसखोरी केली असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी पूर्व सेनाप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हवाला दिला आहे. मात्र या वादग्रस्त पुस्तक आणि यामधील दावे यावरुन सत्ताधारी खासदार आक्रमक झाले आहेत. याच परिस्थितीवर काँग्रेस पक्षाने AI वापरुन व्हिडिओ तयार करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे.

काँग्रेस पक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना धारेवर धरले आहे. चीनी सैन्य घुसखोरी करत असताना सैन्याला योग्य निर्णय दिला नसल्याचा आरोप केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे आणि जे योग्य वाटेल ते करा असे म्हटल्यामुळे सैन्याला पाऊले उचलता आली नाही असा दावा काँग्रेस पार्टीने केला आहे. याबाबत फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकामध्ये उल्लेख असल्याचे देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. हे पुस्तक देखील राहुल गांधी हे संसदेमध्ये घेऊन आले होते.

“जो उचित समझो, वो करो” pic.twitter.com/Ua1tZ59Ikn — Congress (@INCIndia) February 4, 2026

हे देखील वाचा : हॅलो…गद्दार दोस्त! संसदेच्या आवारात राहुल गांधी अन् रवनीत बिट्टू यांच्यात शाब्दिक चकमक

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत खात्यावर शेअर केलेल्या ५५-सेकंदांच्या क्लिपमध्ये, भारत-चीन लडाख तणावादरम्यान ३१ ऑगस्ट २०२० रोजी रेचिनला खिंडीत घडलेल्या घटनांचे नाट्यमय चित्रण केले आहे, जे माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. यात, आदेश मागणाऱ्या सैनिकांच्या दृश्यांवर मोदींचे ‘जे योग्य वाटेल, ते करा’ हे वाक्य टाकण्यात आले आहे, आणि वाढत्या धोक्यांदरम्यान जबाबदारी झटकल्याचे चित्र निर्माण केले आहे. भाजपचे टीकाकार या व्हिडिओला अनैतिक डीपफेक प्रचार म्हणतात, जो सशस्त्र दलांचा अपमान करतो, तर काँग्रेस याचा वापर मोदींच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी करत आहे. आत्मचरित्रातील हा उतारा प्रदीर्घ मंजुरीच्या विलंबानंतर फेब्रुवारी २०२६ मधील एका मासिकाच्या लेखात पहिल्यांदा समोर आला होता.

हे देखील वाचा : जनरल नरवणे यांच्या पुस्तकात असं आहे तरी काय? ज्यावरुन संसदेमध्ये पेटला वाद

मात्र कॉंग्रेसच्या या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. राजकीय वादामध्ये देशाच्या सशस्त्र दलाचा आणि जवानांचा अपमान होत असल्याचे नेटकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे. काँग्रेस पार्टीने भाजपवर टीका करणे योग्य आहे मात्र राजकारणामध्ये देशाचा अपमान नाही केला पाहिजे, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Congress ai video mocks pm narendra modi words in 2020 ladakh standoff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • AI technology
  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
1

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
2

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात
3

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

boAt ने आणले AI ईयरबड्स! Google Gemini मुळे आता इअरफोन स्वतःहून सगळं करणार; काय आहे CREST फीचर?
4

boAt ने आणले AI ईयरबड्स! Google Gemini मुळे आता इअरफोन स्वतःहून सगळं करणार; काय आहे CREST फीचर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.