Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Replied PM Modi: गांधी, कबर, नेहरू-इंदिरा आणि देशद्रोही..; मोदींच्या भाषणाला राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर

काँग्रेसची ही कृती त्यांच्या शीखांबद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असून, लोकांचा अपमान करणे हा त्या पक्षाच्या राजकीय संस्कृतीचाच भाग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 06, 2026 | 12:33 PM
"पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत"; राहुल गांधींचा घणाघाती आरोप (Photo Credit- X)

"पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत"; राहुल गांधींचा घणाघाती आरोप (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • नरेंद्र मोदींचा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत विरोधी पक्षांवर, विशेषतः काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला
  • मोदी, तुमची कबर खोदली जाईल” सारख्या घोषणा काँग्रेसच्या तीव्र द्वेषाचे प्रतिबिंब आहेत
 

Rahul Gandhi Replied PM Modi:  राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधी पक्ष त्यांच्या सततच्या निवडणुकीतील पराभव स्वीकारण्यास असमर्थ आहे. माझ्याबाबत द्वेषाची भावना असूनही काँग्रेस कघीही माझी कबर खोदू शकणार नाहीत. कारण लाखो भारतीयांचे आशीर्वाद त्यांचे संरक्षणात्मक कवच आहेत.” अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. .

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी केलेल्या गोंधळाबद्दल खेद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, “हा केवळ एका महिला आणि आदिवासी राष्ट्रपतींचाच नव्हे तर देशाच्या सर्वोच्च संवैधानिक कार्यालयाचा आणि संविधानाचाही अपमान आहे. अशा लोकांनी संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.”

Lucky Oberoi murder : पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा; AAP नेत्यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

‘देशद्रोही’ या शब्दावरून गोंधळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत विरोधी पक्षांवर, विशेषतः काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. राहुल गांधी यांच्या विधानांचा संदर्भ देत, हे वक्तव्य केवळ ‘देशद्रोही’ नसून संपूर्ण शीख समुदायाचा अपमान असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. काँग्रेसची ही कृती त्यांच्या शीखांबद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असून, लोकांचा अपमान करणे हा त्या पक्षाच्या राजकीय संस्कृतीचाच भाग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनाच्या प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधानांनी सुमारे ९७ मिनिटे भाषण केले. त्यांनी विरोधकांच्या “मोदी, तुमची कबर खोदली जाईल” या घोषणाबाजीचा उल्लेख करत प्रत्युत्तर दिले की, काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाचा दृष्टिकोन मांडण्यात अपयशी ठरला असून केवळ एका ‘राजघराण्या’च्या हितासाठी कार्यरत आहे. तसेच, काँग्रेसने महात्मा गांधींच्या आडनावाचाही केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी पंतप्रधानांनी तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवर घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप केला. पंतप्रधानांचे भाषण सुरू असतानाच विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यांच्या अनुपस्थितीतच राज्यसभेने आवाजी मतदानाने आभारप्रदर्शनाचा प्रस्ताव मंजूर केला.

US-Iran Oman Talks: आखाती देशांचा श्वास रोखला! ओमानमध्ये आज अमेरिका-इराण आमनेसामने

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मोदी, तुमची कबर खोदली जाईल” सारख्या घोषणा काँग्रेसच्या तीव्र द्वेषाचे प्रतिबिंब आहेत, परंतु अशा घोषणा असूनही, आमच्या सरकारच्या लोककल्याणकारी योजना सुरूच राहतील. तुम्ही कितीही घोषणा दिल्या तरी तुम्ही माझी कबर खोदू शकणार नाही. लाखो माता आणि बहिणींचे आशीर्वाद माझे ढाल आहेत.”

काय म्हणाले राहुल गांधी?

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर खासदार राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे. ” बस तुम्ही फक्त प्रश्नांना इतके घाबरता? मोदीजी तुम्ही सत्याला घाबरत आहात, खोट्याचा आधार घेत आहात. असो. तु्म्हाला जे योग्य वाटले ते तुम्ही केले.”

बस सवालों से इतनी घबराहट? मोदी जी सच्चाई से ऐसा डरे,
झूठ की शरण ले ली।
खैर, जो उचित समझा, वही किया। — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 5, 2026

काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात नेहरू आणि इंदिरा गांधींचाही उल्लेख केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी नर्मदा नदीवरील धरणाची कल्पना केली होती, नेहरूंनी पायाभरणी केली होती, परंतु पंतप्रधान झाल्यानंतर नेहरुंननी त्याचे उद्घाटन केले.  नेहरू हे नियोजन आयोगाचे जनक होते, ज्यावर इंदिरा गांधींनी नंतर टीका केली, परंतु २०१४ नंतर आमच्या सरकारने ते रद्द केले आणि नीती आयोगाची स्थापना केली.” असंही पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

Web Title: Rahul gandhi gave a fitting reply to narendra modis criticism of jawaharlal nehru and indira gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Congress Politics
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi
  • rajya sabha

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
1

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
2

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात
3

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
4

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.