Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

One Nation One Election : एक देश एक निवडणुकीला विरोधकांचा विरोध; काय आहे कारण?

माझा या विधेयकाला विरोध आहे. 2 दिवसांपूर्वी आपण संविधानावर चर्चा करत होतो आणि 2 दिवसात संविधानावर हल्ला होत आहे. हे विधेयक संघराज्याच्या विरोधात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 17, 2024 | 02:16 PM
One Nation One Election : एक देश एक निवडणुकीला विरोधकांचा विरोध; काय आहे कारण?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज (17 डिसेंबर) लोकसभेत ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक सादर करण्यात आले आहे. लोकसभेच्या वेबसाइटवर आजच्या सुधारित अजेंड्यानुसार केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडले. या विधेयकाला एनडीएच्या मित्रपक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे. सरकारकडूनही या विधेयकाला हिरवा कंदील मिळाला आहे.  मित्रपक्षांकडूनही या विधेयकाला पाठिंबा देण्यात आला आहे.

पण दुसरीकडे विरोधी पक्ष वन नेशन, वन इलेक्शन विधेयकाला विरोध करत आहेत. अनावश्यक विधेयक आणि वास्तविक मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी या विधेयकाचा घाट घातला जात आहे. असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या सर्व लोकसभा खासदारांना व्हीप जारी करण्यात आला असून, आजच्या महत्त्वाच्या कामकाजासाठी त्यांची सभागृहात उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal: “मी मंत्रीमंडळात असावं,’ असा आग्रह फडणवीसांनी धरला होता, पण…,” छगन भुजबळ यांनी स्पष्टचं

यासाठी होतोय वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला विरोधकांचा विरोध

आम आदमी पार्टी 

वन नेशन वन इलेक्शनला आम आदमी पार्टी विरोध करणार आहे. वन नेशन वन इलेक्शनमुळे देशातील संविधान आणि लोकशाही नष्ट होईल, असे आपचे नेते संजय सिंह यांनी म्हटले आहे.  नेत्यांमध्ये निवडणुकीचीभीती आहे.  अशा निवडणुकांमुळे देशात महागाई शिगेला पोहोचेल.

टीएमसी आणि डीएमके, ठाकरे गट,शरद पवार गटाचाही विरोध

काँग्रेस आणि सपापाठोपाठ टीएमसी आणि डीएमकेनेही या विधेयकाला विरोध केला आहे. टीडीपीने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. पण इंडियन युनियन मुस्लिम लीगने या विधेयकाला विरोध केला आहे. शिवसेनेने यूबीटी या विधेयकाला विरोध केला आहे. एआयएमआयएमने या विधेयकाला विरोध केला आहे. सीपीएमने या विधेयकाला विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी या विधेयकाला विरोध केला आहे.

शरद पवारसारखा कार्यकर्त्यांना जपणारा नेता महाराष्ट्रात नाही…; भुजबळांच्या नाराजीनंतर

या विधेयकाला विरोध करताना सपा खासदार धर्मेंद्र यादव म्हणाले की, माझा या विधेयकाला विरोध आहे. 2 दिवसांपूर्वी आपण संविधानावर चर्चा करत होतो आणि 2 दिवसात संविधानावर हल्ला होत आहे. हे विधेयक संघराज्याच्या विरोधात आहे. ज्यांना 8 विधानसभा एकत्र जमवता येत नाहीत, ते एक देश, एक निवडणूक बोलतात. हे विधेयक दलितविरोधी, मागासवर्गविरोधी, मुस्लिमविरोधी आहे. त्यामुळे या विधेयकाला माझा विरोध आहे.

तर, एक देश एक निवडणूक विधेयकावर काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले, ‘काँग्रेस एक देश एक निवडणूक विधेयक पूर्णपणे नकार दिला आहे. हे विधेयत संयुक्त संसदीय समितीकडे सोपवण्याची मागणी आम्ही करणार आहोत. हे विधेयक असंवैधानिक आहे. हे मूलभूत संरचनेच्या विरोधात आहे आणि या देशातील लोकशाही आणि उत्तरदायित्व नष्ट करणे हा त्याचा उद्देश आहे, असा आरोप जयराम रमेश यांच्याकडून करण्यात आला आहे.

Raj Kundra: ‘मला भेटलेली एखादी मुलगी घेऊन या’; पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राचा मोठा

‘आमचा पक्ष याला विरोध करेल कारण ते घटनेच्या सर्व कलमांच्या विरोधात आहे.असा आरोप समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी केला आहे. तर ‘लोकशाही संदर्भात एकच शब्द अलोकतांत्रिक आहे. लोकशाही बहुसंख्येला अनुकूल आहे. एका व्यक्तीच्या दुस-याबद्दलच्या भावनांना जागा नाही, ज्यामुळे सामाजिक सहिष्णुतेचे उल्लंघन होते. वैयक्तिक पातळीवर एकतेची भावना अहंकाराला जन्म देते आणि सत्तेचे हुकूमशाहीत रूपांतर करते,असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

Web Title: Oppositions opposition to one nation one election what is the reason nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 02:16 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • One Nation One Election

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
3

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.