Pahalgam Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जवळपास दीड महिना उलटला. तरीही या सर्व घडामोंडीबाबत आजही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. असे असतानाच केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत या हल्ल्यासंदर्भात एक महत्त्वाचे विधान केलं आहे.
पहलगाममध्ये दीड महिन्यापूर्वी झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ सुरक्षा हल्ला नसून भारताच्या अर्थव्यवस्थेवर केलेला आर्थिक हल्ला होता. काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राला लक्ष्य करून स्थानिक अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर, भारताला जर अणुहल्ल्याची धमकी देण्यात आली तरी पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर दिलेच जाईल, असा खुला इशाराही एस. जयशंकर यांनी दिला आहे.
न्यू यॉर्कमधील न्यूजवीकशी बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, हा हल्ला केवळ लोकांना घाबरवण्यासाठी करण्यात आला नव्हता तर काश्मीरच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत असलेल्या पर्यटनाला संपवण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कराराचा दबाव आणून भारत आणि पाकिस्तानवर युद्धबंदी केली, असे सांगितले असले तरी त्यात कोणतेही तथ्य नाही, असंही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे.
स्मृती मानधनाचा डोळा नंबर-1 च्या सिंहासनवर! फलंदाजाची करिअरची सर्वोत्तम रेटिंग कोणती?
जयशंकर म्हणाले, “अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स फोनवर बोलले तेव्हा मी स्वतः पंतप्रधान मोदींसोबत होतो. त्या संभाषणात व्यापार कराराचा कोणताही उल्लेख नव्हता. भारत दहशतवादाविरुद्ध उभा राहील आणि कोणताही धोका किंवा दबाव आपल्याला रोखू शकत नाही, असंही त्यांनी व्हान्स यांना फोनवर स्पष्टपणे सांगितलं होतं
यावेळी एस. जयशंकर यांनी एक मोठा खुलासाही केला. ९ मे २०२५ च्या रात्री जेव्हा पाकिस्तानने भारतावर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता. पण त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली भूमिका ठामपणे मांडली.
एस. जयशंकर म्हणाले, “अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार असल्याचे सांगितले तेव्हा मी खोलीत होतो. पण आम्ही काही अटी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. पंतप्रधानांनी त्यावेळी पाकिस्तानच्या धमकीची कोणतीही पर्वा न करता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची तयारीही दर्शवली.” उलट पंतप्रधान मोदींनी, “भारताच्या बाजूने निश्चितच उत्तर दिले जाईल. पाकिस्तानने त्या रात्री भारतावर खरोखरच मोठा हल्ला केला होता, परंतु भारतीय सैन्याने त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आणि पाकिस्तानच्या शस्त्रसंधी (सीजफायर) प्रस्तावाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. न्यूयॉर्कमध्ये न्यूजवीकचे सीईओ देव प्रगड यांच्यासोबत झालेल्या Fireside Chat कार्यक्रमात बोलताना जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानकडून भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताची प्रतिक्रिया ही पूर्णपणे स्वयंपूर्ण (आत्मनिर्भर) आणि ठोस होती. भारताने कुणावर अवलंबून न राहता स्वतःच्या सुरक्षेसाठी निर्णायक पावले उचलली आहेत. दहशतवादाचा सामना करताना आम्ही कोणतीही मोकळीक देत नाही.”
१० मे रोजी भारताच्या परराष्ट्र संबंधांमध्ये महत्त्वाची घडामोड घडली. सकाळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान रुबियो यांनी सूचित केले की, पाकिस्तान भारतासोबत चर्चेसाठी तयार आहे. त्याच दिवशी दुपारी, पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांनी थेट भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्याशी संपर्क साधून युद्धबंदीचे (सीजफायर) आवाहन केले.