मिरारोड/विजय काते : राज्यात हिंदी सक्तीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. शालेय शिक्षणात हिंदी सक्ती केल्यामुळे महाराष्ट्रात मराठी ऐवजी हिंदींची सक्ती सरकारकडून का केली जाते आहे ? असा सवाल सध्या अनेक मराठी नागरिकांकडून विचारला जात आहे. मराहाराष्ट्रात मराठीला डावललं जाणं कदापि स्विकारणार नाही याच हेतूने ठाकरे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ताी विरोधात आंदोलन छेडलं आहे. शालेय शिक्षण मंडळाने केलेल्या या हिंदी सक्तीने राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता पुन्हा मनसे कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मिरारोड मध्ये मनसैनिकांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकान मालकास चांगला चोप दिला आहे.मिरारोडच्या बालाजी हॉटेल जवळ ही घटना घडली आहे.मिरारोडचे उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांनी दुकान चालकाच्या कानशिलात लगावली आहे.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. मिरोरोड येथील एका हिंदी भाषिक दुकानाला मालकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्ती बाबत दोन जीआर रद्द केले.त्याची घोषणा रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत पत्रकार परिषदेत केली.या निर्णयाने संपूर्ण राज्यभरात मराठी प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.राज्यभरात मनसैनिकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी मिरा भाईंदर मधील मनसैनिकांनी मिरारोड मधील बालाजी हॉटेल जवळ जल्लोष साजरा करत होते.पाणी पिण्यासाठी जोधपूर स्वीट या दुकानात गेले.या दरम्यान दुकान मालक हिंदी भाषेत बोलत असताना आपण मराठी शिका आणि बोला असे मनसैनिकानी सांगितले.
दुकान मालक यांनी मराठी भाषा बोलण्यास नकार दिला.यावेळी आपण ज्या राज्यात नोकरी व्यवसाय करता,त्या भाषेचा आदर का करत नाही असे अनेक प्रश्न मनसैनिकांनी विचारले.योग्य उत्तर न दुकान मालकाकडून मिळाल्याने मनसैनिकानी चांगलच चोप दिला आहे.एका बाजूला संपूर्ण राज्यभरात मनसैनिकांकडून जल्लोष सुरू तर दुसरीकडे मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला प्रसाद मनसे कडून देण्यात आला.शहरातील परप्रांतीयांना मनसैनिकांकडून विनंती आहे की,आपण ज्या राज्यात राहत आहात त्या संस्कृतीचा,भाषेचा आदर करावा अन्यथा मनसे खळखट्याक केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिक्रिया उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांनी दिली आहे.