मॉकड्रिलच्या आदेशाने हादरला पाकिस्तान! भारताच्या कठोर निर्णयावर पाक आर्मी चीफ बरळले; म्हणाले, "आमची प्रतिष्ठा..."
India Vs Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर दोन्ही देशांच्या हालचाली वाढल्या आहेत. युद्धाभ्यास केला जात आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ७ मे रोजी ब्लॅक आउट आणि मॉक ड्रिल व सायरन वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारत पाकिस्तानवर निर्वाणीचा घाव घालण्याची शक्यता वाढली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ७ तारखेला सायरन वाजवण्याचे निर्देश दिले आहेत. यावर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान बावचळला आहे. भारतात ७ मे म्हणजेच गुरुवारी मॉक ड्रिल केले जाणार आहे. या अभ्यासामुळे भारत पाकिस्तानविरुद्ध युद्धाची घोषणा करतो कि काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान यावर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी देखील भाष्य केले आहे. पाकिस्तान आपली प्रतिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमच प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. जनरल असीम मुनीर रावळपिंडी येथे बोलत होते.
पाकिस्तान केवळ अंतर्गत नव्हे तर बाहेरच्या भागातसुद्धा शांतता राखण्यासाठी अग्रेसर आहे. मात्र आमच्या देशाला कोणी आव्हान देत असेल तर आमचा देश नागरिकांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यासाठी चोख उत्तर देण्यास सक्षम आहे.
राहुल गांधी PM मोदींच्या भेटीला; पाकिस्तानबाबत अंतिम निर्णय होणार?
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यातच आता पाहलगं हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत महत्वाच्या घटना घडत आहेत. रोज महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी पीएमओ ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पहलगाम हल्ल्याविषयी चर्चा होणार की अन्य कोणत्या विषयांवर ते काही वेळाने स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’; ‘चिनाब’वरील बगलिहार डॅमचे दरवाजे बंद, शत्रूराष्ट्राची पाण्यासाठी वणवण
भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानची बोबडी वळली आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आला आहे. मात्र आता भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केली आहे. भारताने चिनाब नदीचे पाकिस्तानकडे जाणारे पाणी बंद केले आहे. बगलिहार धंरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.