Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: “…तर भारत सुरक्षित राहणार नाही”; ‘नापाक’ संरक्षणमंत्री पुन्हा बरळले

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2025 | 04:01 PM
Pahalgam Terror Attack: "...तर भारत सुरक्षित राहणार नाही"; 'नापाक' संरक्षणमंत्री पुन्हा बरळले

Pahalgam Terror Attack: "...तर भारत सुरक्षित राहणार नाही"; 'नापाक' संरक्षणमंत्री पुन्हा बरळले

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. भारताने काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. दरम्यान यामध्येच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी उलटी भारतालाच धमकी दिली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची  कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तान खवळला आहे. मात्र पाकिस्तानच दशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मान्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला मुळखत देताना त्यांनी हे विधान केले.

पहलगाममध्ये झालेला हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नसल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही. निष्पाप नागरिकांचा बळी जेल नको हीच आमची भूमिका आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे.

भारत आपल्यावर हल्ला करेल अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. दरम्यान भारताने यांच्या भूमीवर किंवा शहरांमध्ये दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. भारताला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराच ख्वाजा आसिफ यांनी दिला आहे. भारताने लष्करी युद्धाभ्यास सुरू केल्याचे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

भारताने घेतला पहलगामचा बदला

बांदीपोरा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्यात चकमक सुरु आहे. दरम्यान यामध्ये लष्कराला मोठे यश मिळाले आहे. लष्कराने लष्कर ए तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा केला आहे. भारताच्या जवानांनी लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लालीचा खात्मा केला आहे. बंदिपोरा येथे सैन्य दलाला हे यश मिळाले आहे. या संपूर्ण परिसराची लष्कराने कोंडी केली आहे. सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे.

Pahalgam Terror Attack: भारताने घेतला पहलगामचा बदला; ‘LET’ च्या टॉप कमांडर अल्ताफ लालीला ठोकला

भारतीय लष्कराला या टॉप कमांडरचा शोध होता. अखेर आज त्याला ठोकण्यात सैन्य दलाला यश आले आहे. मात्र या चकमकीत भारताचे २ जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल द्विवेदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. तर राहुल गांधी देखील पहलगाम दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळीच बांदीपोरा जिल्ह्यातील कलपुरा भागात सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

सीमारेषेजवळ उडाले ‘राफेल’ जेट्स

भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. तर काल सर्व पक्षांची एक बैठक देखील सरकारने घेतली आहे. मात्र आता भारतीय वायुसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेली आहे. भारतीय वायुसेनेने ‘आक्रमण’ ऑपरेशन ड्रिल केले आहे. ‘आक्रमण’ ड्रिलमध्ये भारतीय वायुसेनेच्या सर्वात अत्याधुनिक अशा राफेल जेट्सच्या नेतृत्वात आघाडीच्या लढाऊ ताफ्याचे प्रदर्शन करण्यात आले. भारतीय हवाई दलाकडे हरियाणातील अंबाला आणि पश्चिम बंगालमधील हशिमारा येथे दोन राफेल स्क्वॉड्रन तैनात आहेत. ही अत्याधुनिक विमाने सध्या सुरू असलेल्या सरावाच्या केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळाले.

 

Web Title: Pakistan deffence minister khawaja asif warn to india about conduct terrorism activity pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • Modi government
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

S400 Theft : रशियन S-400 तंत्रज्ञान चोरण्याच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले; रशियाने बसवली जबर वचक
1

S400 Theft : रशियन S-400 तंत्रज्ञान चोरण्याच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले; रशियाने बसवली जबर वचक

65 वर्षानंतर पहिल्यांदाच…Ranji Trophy च्या इतिहासात झाला मोठा उलटफेर! जम्मू-काश्मीरने केला दिल्लीचा पराभव
2

65 वर्षानंतर पहिल्यांदाच…Ranji Trophy च्या इतिहासात झाला मोठा उलटफेर! जम्मू-काश्मीरने केला दिल्लीचा पराभव

Pakistan Blast In Car : पाकिस्तानची राजधानी स्फोटाने हादरली; उच्च न्यायालयाजवळ कार स्फोटात 12 जणांचा मृत्यू
3

Pakistan Blast In Car : पाकिस्तानची राजधानी स्फोटाने हादरली; उच्च न्यायालयाजवळ कार स्फोटात 12 जणांचा मृत्यू

२,९०० किलो स्फोटके जप्त, दोन डॉक्टरांसह ७ जणांना अटक, सर्वात मोठ्या जैश मॉड्यूलचा पर्दाफाश
4

२,९०० किलो स्फोटके जप्त, दोन डॉक्टरांसह ७ जणांना अटक, सर्वात मोठ्या जैश मॉड्यूलचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.