Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडला कश्मीरबाहेर काढण्यासाठी मास्टरप्लॅन; भारतीय सैन्य अलर्टवर

हाशिम मुसा सैन्याकडून मारला गेल्यास किंवा पकडला गेल्यास पाकिस्तानची मोठी नाचक्की होणार आहे. तसेच पाकिस्ताना आणि दहशतवादाचे कनेक्शनही उघड होणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 03, 2025 | 10:09 AM
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडला कश्मीरबाहेर काढण्यासाठी मास्टरप्लॅन;  भारतीय सैन्य अलर्टवर
Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-कश्मीर : पहलगाम हल्ल्यातील फरार आरोपींचा भारतीय तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळापासून ३० किलोमीटरच्या परिसरातच ते दहशतवादी लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हल्ल्याचा मास्टरमाइंड हशिम मुसासह इतर दहशतवादी आता कश्मीरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दहशतवादी कश्मीच्या घनदाट डोंगरांमधील गुफांमध्ये लपल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच, या दहशतवाद्यांकडे काही दिवसांचाच अन्नसाठी शिल्लक राहिल्यामुळे त्यानंतर अन्नासाठी ते बाहेर पडतील, त्यावेळी त्यांना घेरण्याची योजना तपास यंत्रणांकडून राबवली जाणार आहे. तपास यंत्रणांकडून २४ तास त्यांचा शोध घेतला जात आहे.

एका माहितीनुसार पाकिस्तानच्या काही हँडलरकडून या दहशतवाद्यांना कश्मीरच्या बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे. पण भारतीय सैन्याकडून सुरू असलेल्या शोध मोहिमेमुळे त्या लोकांना बाहेर पडण्यात अडचणी येत आहेत. सैन्याच्या शोधमोहिमेमुळे त्या दहशतवाद्यांना पकडण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय दहशवाद्यांची शोधमोहिम आणि सैन्याचे ऑपरेशन पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी इस्त्रायलच्या तपास यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे. आयएसआय कडून पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड हाशिम मुसाला कश्मीच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. हाशिम मुसा सैन्याकडून मारला गेल्यास किंवा पकडला गेल्यास पाकिस्तानची मोठी नाचक्की होणार आहे. तसेच पाकिस्ताना आणि दहशतवादाचे कनेक्शनही उघड होणार आहे.

Ajit Pawar News: शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले नाही: अजित पवारांनी हात झटकले

दहशतवाद्यांनी वापरलेला सॅटेलाइट फोन संदर्भातील माहिती मिळवली जात असून, या तपासासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून, हा हल्ला लश्कर-ए-तैयबा या संघटनेने आयएसआयच्या सूचनेवरून रचला होता. पहलगाम परिसरात २० एप्रिलनंतर वापरले गेलेले सर्व मोबाइल नंबर आणि कॉल डेटा तपासणीखाली आहेत. दहशतवादी अनंतनाग जिल्ह्याच्या हद्दीत लपून बसल्याचा विश्वास तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. तेथील जंगलांतील गुफा त्यांच्या लपण्याच्या सुरक्षित ठिकाणी ठरल्या आहेत. त्यांच्या जवळ १५ ते २० दिवस पुरेल इतका अन्नसाठा असल्याचे समजते. हा साठा संपल्यानंतर, अन्नअभावी त्यांना जंगलाबाहेर यावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हाशिम मुसा आणि त्याच्यासोबत हत्याकांडात सहभागी असलेल्या दहशतवादी एक दिवस आधीच बैसरनमध्ये दाखल झाले होते   का, याचा तपास सध्या सुरक्षा यंत्रणा करत आहेत. या दहशतवाद्यांची रेखाचित्रे आणि छायाचित्रे सार्वजनिक करण्यात आली असून, त्यांच्याशी साम्य असलेल्या काही संशयितांची उपस्थिती स्थानिकांनी नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर, तपास यंत्रणांनी २१ एप्रिल रोजी बैसरन भागात असलेल्या घोडेस्वार, रेस्टॉरंट चालक तसेच इतर सेवा पुरवणाऱ्या नागरिकांची चौकशी केली आहे.

Web Title: Pakistans master plan to take the mastermind out of kashmir indian army on alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • Jammu Kashmir News
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
1

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का
2

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का

Operation Sindoor: “कान उघडे ठेवून ऐका…”; राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं
3

Operation Sindoor: “कान उघडे ठेवून ऐका…”; राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं

SCO बैठकीत जयशंकर यांनी केली टीका, पाकिस्तानचे सूरच बदलले! परदेशमंत्री इशाक डार म्हणाले, ‘भारत आणि अन्य शेजारी देशांसह…’
4

SCO बैठकीत जयशंकर यांनी केली टीका, पाकिस्तानचे सूरच बदलले! परदेशमंत्री इशाक डार म्हणाले, ‘भारत आणि अन्य शेजारी देशांसह…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.