Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत दोन्ही सभागृहांच्या कायदेविषयक कामकाज आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 01, 2025 | 12:03 PM
Parliament Winter Session:

Parliament Winter Session:

Follow Us
Close
Follow Us:
  • संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू
  • केंद्र सरकार अणुऊर्जा, उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि कॉर्पोरेट/शेअर बाजार नियमांसह १० महत्त्वाची विधेयके मांडणार
  • इंडिया आघाडीतील पक्ष SIR, मतचोरी आणि वायू प्रदूषण यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी
Parliament Winter Session:   संसदेचे हिवाळी अधिवेशन आज, सोमवार (१ डिसेंबर) पासून सुरू होत असून ते १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मांडण्याची योजना आखत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षदेखील सरकारला घेरण्याची तयारी करत आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार (Central Government)  अणुऊर्जा, उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि कॉर्पोरेट/शेअर बाजार नियमांसह १० महत्त्वाची विधेयके मांडणार आहे. तर इंडिया आघाडीतील ( India Alliance)  पक्ष SIR, मतचोरी आणि वायू प्रदूषण यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी करत आहे.

Narendra Modi: “काही पक्ष पराभव पचवू शकत नाहीत, सभागृहात नाटक नाही, काम पाहिजे”, नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मिळालेल्य माहितीनुसार यंदाच्या अधिवेशनात केंद्र सरकार नागरी अणु क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यासाठी एक विधेयक मांडणार आहे. याव्यतिरिक्त, भारतीय उच्च शिक्षण आयोग, राष्ट्रीय महामार्ग (सुधारणा), कॉर्पोरेट कायदे सुधारणा, सिक्युरिटीज मार्केट्स कोड २०२५ आणि लवाद कायद्यांतील बदल यासारख्या इतर विधेयकांवर चर्चा केली जाईल.

विरोधकांचा पलटवार

दुसरीकडे विरोधी पक्षांकडूनही हिवाळी अधिवेशनात काही गंभीर मुद्दे मांडण्याची तयारी केली जात आहेत. विरोधी पक्षांनी दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यापासून १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विशेष सघन सुधारणा (SIR) या मुद्द्यांवरून सरकार घेरण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाशी कथित “संगनमत” आणि सत्ताधारी भाजपकडून “मत चोरी” झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्याचे संकेतही विरोधी पक्षाने दिले आहेत. जेव्हा लोकशाहीची हत्या केली जात असते तेव्हा “मत चोरी” नाही तर “मतांवर दरोडा” हा कळीचा मुद्दा बनला आहे.

सर्वपक्षीय बैठकीत काय घडले?

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत दोन्ही सभागृहांच्या कायदेविषयक कामकाज आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेतील सभागृह नेते आणि आरोग्य मंत्री जेपी नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. विरोधी पक्षात काँग्रेसचे प्रमोद तिवारी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ’ब्रायन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, द्रमुकचे तिरुचित शिवा आणि इतर पक्षांचे नेते होते.

LPG Gas Price: आनंदाची बातमी! 1 डिसेंबरपासून कमी झाले LPG सिलेंडरचे भाव, तुमच्या शहरातील लेटेस्ट दर घ्या

१० विधेयके मांडली जाणार

या अधिवेशनात एकूण १० विधेयके मांडली जाण्याची अपेक्षा आहे, या अणुऊर्जा विधेयक, २०२५, भारतीय उच्च शिक्षण आयोग विधेयक, राष्ट्रीय महामार्ग सुधारणा विधेयक, कॉर्पोरेट कायदे सुधारणा विधेयक, सिक्युरिटीज मार्केट्स कोड, २०२५, लवाद कायदा सुधारणा, या प्रमुख विधेयकांचा समावेश आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी, सर्व खासदार “थंड डोक्याने काम करतील” आणि या अधिवेशनात व्यत्यय टाळतील. जर संसदेत कोणताही वाद किंवा वाद निर्माण झाला तर तो तापू नये, तर तो शांततेने आणि वस्तुनिष्ठपणे सोडवला जावास अशी विनंतीही केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अधिवेशन किती दिवस चालणार आहे?

    Ans: संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होऊन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

  • Que: विरोधी पक्षांचा प्रमुख फोकस कोणत्या मुद्द्यांवर आहे?

    Ans: विरोधक दिल्लीतील वायू प्रदूषण, १२ राज्यांमधील विशेष सघन सुधारणा (SIR), निवडणूक आयोगाशी कथित संगनमत, आणि "मत चोरी" यांसारख्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत.

  • Que: हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार कोणती महत्त्वाची विधेयके मांडणार आहे?

    Ans: नागरी अणुऊर्जा क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यासंबंधी विधेयक, भारतीय उच्च शिक्षण आयोग सुधारणा, कॉर्पोरेट कायदा सुधारणा, सिक्युरिटीज मार्केट्स कोड २०२५, राष्ट्रीय महामार्ग सुधारणा आणि लवाद कायद्यातील बदल

Web Title: Parliament winter session winter session of parliament begins key bills and opposition strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • INDIA Alliance
  • parliament winter session 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.