मुंबई: अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील ४० पर्यटक अडकले होते. या घटनेसंदर्भात राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून सिक्कीम येथील आपत्कालीन कार्य केंद्रासी तत्काळ संपर्क साधण्यात आला. या संदर्भात सिक्कीम प्रशासन यांनी सूचना/ अॅडवायसरी निर्गमित केल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त यांनी सिक्कीम प्रशासनाशी संपर्क साधला. सद्य:स्थितीत पाऊस थांबला असल्याने नॉर्थ सिक्कीम ते गंगटोक रस्ता चालू झाला आहे. रस्ता सुरू झाल्याने अडकलेल्या प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
सिक्कीममध्ये अडकले १५०० पर्यटक
उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे. लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. लाचेनमध्ये 115 आणि लाचुंगमध्ये 1,350 पर्यटक मुक्कामी आहेत. भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी रस्ते बंद झाल्याची माहिती मंगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया यांनी दिली आहे.
Sikkim Army Camp Landslide: सिक्कीमध्ये लष्करी छावणीत भुस्खलन; ३ जणांचा मृत्यू ९ जवान बेपत्ता
दरम्यान, लाचुंगला जाणारा रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून आजपासून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू होईल. बीआरओ टीमने भूस्खलनामुळे साचलेला ढिगारा साफ केला आहे, खराब झालेले भागांचे बांधकाम करून पुर्ववत करण्यात आले आहेत. फिदांग येथील ‘सस्पेंशन ब्रिज’जवळील भेगा भरण्यात आल्या असून लाचुंग-चुंगथांग-शिप्स्यारे-शांकलांग-डिक्चू रस्त्यावर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…
सततच्या मुसळधार पावसानंतर, ३० मे रोजी अचानक ढगफुटी झाल्याने उत्तर सिक्कीममध्ये मोठे नुकसान झाले. या काळात, १३० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आणि लाचेन, लाचुंग, गुरुडोंगमार, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि झिरो पॉइंट यासारख्या प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्या, पुलांचे नुकसान झाले
राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६.६ मिमी पावसाची नोंद
दिनांक १ जून पासून ते २ जून सकाळपर्यंत राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६.६ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ११.४ मिमी, मुंबई उपनगर ८.० मिमी, कोल्हापूर ७.९ मिमी, रायगड ४.४ मिमी इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
दिनांक १ जून रोजी सोलापूर व नाशिक जिल्ह्यात विहिरीत पडणे या घटनेमुळे प्रत्येकी एक व्यक्ती मृत झाली असून ठाणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत तीन व्यक्ती जखमी झाल्या असल्याची माहिती राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.