मणिपूरमध्ये पावसाचा कहर (फोटो- सोशल मिडिया)
इम्फाळ: देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान वेलेआधीच दाखल झालेल्या पावसाने उत्तर भारत, ईशान्य भारतात जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. माणिपूर राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने माणिपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे 19 हजारांपेक्षा जास्त नागरिक बेघर झाले आहेत.
पावसाने पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागात पानी साचले आहे. पुराच्या पाण्यामुळे परभवित झालेल्या भागातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हटविण्याचे कार्य सुरू आहे. उत्तर इम्फाळमध्ये हे सुरक्षा कॅम्प उभारण्यात आले आहेत. माणिपूरमध्ये गेलया 4 दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात 40 पेक्षा अधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
चेकान परिसरात नदी दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरात पाणी साचले आहे. दरम्यान राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्यावर राज्यपाल अजय भल्ला यांनी पूर आलेल्या भागांचा दौरा केला. भारतीय सेना आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी 800 पेक्षा जास्त लोकांचे रेस्क्यू केले आहे.
ईशान्य भारतात हाहाःकार
ईशान्य भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दरड कोसळणे आशा घटना घडत आहेत. मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिजोराम या राज्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन राज्यात दोन दिवसांत २० पेक्षा जास्त नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.
अरुणाचल प्रदेशमध्ये महामार्गावर भूस्खलन झाल्याने एक गाडी खोल दरीत कोसळली आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सिक्कीम राज्यात मुसळधार पावसाने १५०० पर्यटक अडकल्याची माहिती समोर येत आहे.
Maharashtra Monsoon: राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट; IMD च्या ‘या’ हाय अलर्टने वाढवली चिंता
आज आणि उद्या हिमाचल प्रदेशात वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने ईशान्य भारतातील राज्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच अनेक राज्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
ल्या काही दिवसांपासून देशासह, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. आतापर्यंत जवळपास १७ राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी रेड अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केला आहे. देशातील सेव्हन सिस्टर्स म्हणजेच आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम व त्रिपुरा राज्यात मान्सून दाखल झाला आहे.