Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काटोल येथील कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; आत्तापर्यंत संचालकांसह 11 जणांना अटक

दारुगोळा आणि अन्य स्फोटक पदार्थांची निर्मिती करणाऱ्यांबाबत केंद्र आणि राज्याचे कायदे आहेत. कायद्यातील तरतूदी तपासाव्या लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 03, 2026 | 08:49 AM
पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला अटक; 4 पिस्तुले, 7 जिवंत काडतुसे जप्त

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला अटक; 4 पिस्तुले, 7 जिवंत काडतुसे जप्त

Follow Us
Follow Us:

कळमेश्वर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात १९ कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीच्या २ संचालकांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, एकूण २१ आरोपींवर कळमेश्वर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने अटकेतील आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या प्रकरणात पोलिसांनी कंपनीचे दोन संचालक रवि प्रकाशचंद्र कामरा (रा. रायपूर) आणि राकेश सुदर्शन तिवारी (रा. नागपूर) यांना ताब्यात घेतले असून, त्यांची रिमांड प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये व्हाईस प्रेसिडेंट चंद्रशेखर ब्रिजमोहन रजवाड यांचा समावेश आहे. वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप सोळंकी, महाव्यवस्थापक प्रदीप शर्मा, उत्पादन व्यवस्थापक रोशन राऊत, उत्पादन व्यवस्थापक फिलिंग नीलकलाम डोंगरे, उत्पादन पर्यवेक्षक पंकज पांडे, लोडिंग पर्यवेक्षक सुधाकर उपरकर, राजेंद्र पारधी आणि विलास मालवे यांना अटक करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : Nagpur Accident: नागपूर जिल्ह्यात स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट; 15 जणांचा मृत्यू, 18 जखमी

दरम्यान, दारुगोळा आणि अन्य स्फोटक पदार्थांची निर्मिती करणाऱ्यांबाबत केंद्र आणि राज्याचे कायदे आहेत. कायद्यातील तरतूदी तपासाव्या लागतील. नियम आणि कायद्यात कसे संशोधन करावे लागेल, याचा अभ्यास करून केंद्राला शिफारस करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सुरक्षेत होत्या त्रुटी

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रथमदर्शनी कंपनीचा निष्काळजीपणा समोर आला आहे. विस्फोटक निर्मिती युनिटमध्ये सुरक्षा उपायांचे पालन करण्यात पेसो, डिश आणि कामगार आयुक्त कार्यालय अपयशी ठरले आहे, त्यांचीही जबाबदारी निश्चित केली जाईल. त्यांनी कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईची घोषणा केली. कंपनीतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी ७५ लाख रुपये तर जखमींना २५ लाख रुपये देण्यात येईल, असे ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी झाला होता स्फोट

नागपूर जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. मोठा स्फोट झाल्याने तिथे भीषण आग लागली. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १८ जण गंभीर जखमी झाले आहे. तर यातून ४ जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना राऊळगाव, तहसील काटोल येथे घडली. या घटनेमुळे गाव हादरून गेला आहे.

Web Title: 11 people including director arrested in katol company blast case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • Blast Case
  • maharashtra news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
1

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा
2

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!
3

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा
4

Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.