Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panjab Politics: ५०० कोटींची ‘सुटकेस’ दिली तरच मुख्यमंत्रीपद? काँग्रेसवर कोणी केले गंभीर आरोप

काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी पात्रतेचे अनेक निकष आहेत. मला कुणीतरी सांगितले होते की कोणीतरी ३५० कोटी रुपयांना मुख्यमंत्रीपद मिळवले.”असा आरोपाही त्यांनी केला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 08, 2025 | 01:09 PM
Congress corruption allegations,

Congress corruption allegations,

Follow Us
Close
Follow Us:
  • मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी ५०० कोटींची मागणी
  • काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा गंभीर आरोप
  • नवज्योत कौर सिद्धू यांच्या विधानानंतर पंजाबच्या राजकारणात नव्या आरोप-प्रत्यारोपांना तोंड
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असतानाच आता पंजाबच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक विधान समोर आले आहे. पंजाबच्या एका बड्या नेत्याच्या पत्नीने   मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी ५०० कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेस नेतृत्त्वावर “मुख्यमंत्रीपदासाठी ५०० कोटींची सुटकेस” मागितल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा उफाळून आला आहे.

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी

मिळालेल्या माहितीनुसार, नवज्योज कौर सिद्धू यांनी शनिवारी पंजाबचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला. नवज्योत कौर म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये जो कोणी ५०० कोटी रुपयांची सुटकेस देतो तो मुख्यमंत्री होतो. पण आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या खूर्चीवर बसण्यासाठी ५०० कोटी रुपये नाहीत. जर कोणताही पक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाब सुधारण्याची संधी देतील तर तेदेखील त्याचे निकाल दाखवून देतील. राज्याचे सुवर्ण पंजाबमध्ये रुपांतर करतील. दरम्यान, गेल्या काही काळापासून नवज्योत सिंग सिद्धू राजकारणापासून दूर आहेत. पण आता त्यांच्या पत्नीने थेट काँग्रेस नेतृत्त्वावर निशाणा साधत पतीच्या राजकारणात परतण्यासोबत पक्ष बदलाचेही संकेत दिले आहेत.

आप आणि भाजपकडून काँग्रेसवर हल्ला

नवज्योत कौर सिद्धू यांच्या विधानानंतर पंजाबच्या राजकारणात नव्या आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटले आहे. आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नील गर्ग यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, “३५०-५०० कोटी रुपयांना मुख्यमंत्रिपद विकणे हे राजकारण नसून भ्रष्टाचाराचा उघड लिलाव आहे.” कौर यांच्या आरोपांनंतर भाजपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी कोणाचेही नाव न घेता, “काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी पात्रतेचे अनेक निकष आहेत. मला कुणीतरी सांगितले होते की कोणीतरी ३५० कोटी रुपयांना मुख्यमंत्रीपद मिळवले.”असा आरोपाही त्यांनी केला

तसेच, “या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची स्थिती नक्की कुठे पोहोचली आहे? आमच्याकडे ३५० किंवा ५०० कोटींचा ऑडिओ पुरावा नाही; कदाचित नवज्योत कौर सिद्धूंकडे असेल.” असेही त्यांनी नमुद केलं. माझ्याकडे खरूर साहिबचे माजी खासदार जसबीर सिंग डिंपा यांचे एक जुने ट्विट आहे, ज्यात काँग्रेसने “डाकू” बसवल्याचा आरोप करण्यात आला होता. “हे डाकू आजही काँग्रेसमध्ये आहेत आणि सत्तेची महत्वाची पदे भूषवत आहेत,” असा आरोप जाखड यांनी केला.

Maharashtra Winter Session Live : विरोधकांना उरला नाही आवाज? इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहा

अवघ्या काही तासांत नवज्योत कौर सिद्धू यांचा युटर्न

काँग्रेसवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर अवघ्या काही तासांत नवज्योत कौर यांनी त्यांच्या ५०० कोटी रुपयांच्या विधानावर यू-टर्न घेतला आहे. ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून चुकीच्या अर्थाने तो दाखवण्यात आला. करण्यात आला. माझे विधान इतक्या साधेपणाने दिले असतानाही त्याचा विपर्यास केला गेला, याचे मला आश्चर्य आहे. काँग्रेस पक्षाने कधीही आमच्याकडे काही मागितले नाही, हे स्पष्ट सांगू इच्छिते.”

ज्यावेळी मला इतर कोणत्या पक्षाकडून नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री पदाच्या ऑफर देण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी पैसे नाहीत. हे स्पष्टपणे सांगितले होते. पण हे विधान चुकीच्या पद्धतीने काँग्रेसच्या मुख्यमंत्री उमेदवाराशी जोडण्यात आले. तसे अजिबात नाही.” असंही कौर यांनी स्पष्ट केलं.

 

Web Title: Pay 500 cr to become cm sidhus wife levels big charge against congress leadership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • Congress
  • panjab

संबंधित बातम्या

Kangana Ranaut on Rahul Gandhi: “अटलजींसारखे बनायचे असेल तर, तुम्हीही भाजप…” कंगना रनौत यांचा राहुल गांधीना आश्चर्यकारक सल्ला
1

Kangana Ranaut on Rahul Gandhi: “अटलजींसारखे बनायचे असेल तर, तुम्हीही भाजप…” कंगना रनौत यांचा राहुल गांधीना आश्चर्यकारक सल्ला

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला
2

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला

निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण, सालेकसामध्ये ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान; काँग्रेसचा गंभीर आरोप
3

निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण, सालेकसामध्ये ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान; काँग्रेसचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालंय…; निकाल लांबणीवरुन वडेट्टीवार आक्रमक
4

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालंय…; निकाल लांबणीवरुन वडेट्टीवार आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.