Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात एल्गार पुकारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 04:20 PM
Congress uses social engineering for appointing district president for Congress, Maharashtra Congress, Congress,

Congress uses social engineering for appointing district president for Congress, Maharashtra Congress, Congress,

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक
  • कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढणार
  • दाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात एल्गार पुकारला असून, ९ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढण्यात येणार आहे. हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

 

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असून, अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारामुळे देशातील शेतकरी व कृषी क्षेत्र देशोधडीला लागणार आहे. आधीच अस्मानी सुलतानी संकटात पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी व्यापारी करार हा मोठा आघात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर सपशेल शरणांगती पत्करली असून या करारामुळे भारतातील शेतमालाला भाव मिळणार नाही परिणामी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भिती आहे. ग्रामीण भागातील गरिब, कष्टकऱ्यांसाठी युपीए सरकारने आणलेली मनरेगा ही हक्काची रोजगार देणारी योजनाही भाजपा सरकारने मोडीत काढली आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

केंद्रातील भाजपा सरकारबरोबरच राज्यातील भाजपा महायुतीचे सरकारही शेतकरी विरोधी असून, गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणून शेत जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांचा या शक्तीपीठाला तीव्र विरोध आहे पण सरकार मात्र या विरोधाकडे कानाडोळा करून त्यांच्या लाडक्या उद्योगपती मित्रासाठी शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत आहे. भाजपा सरकारच्या या जुलमी, अत्याचारी, शेतकरी विरोधी धोरणाविरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली आहे.

अमेरिकेबरोबरचा व्यापार करार, मनरेगा, शक्तीपीठ महामार्ग या प्रमुख मागण्याबरोबरच आदिवासी विशेष पदभरती, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, घरकुल योजना या मागण्यासाठीही हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडे या यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी असून प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांच्यासह हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असंही काँग्रेसकडून सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा : नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी

Web Title: Congress has decided to take out a march from kalamanuri to hingoli against the central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
1

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
3

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण
4

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.