Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशातून लोक आणले, किडनी काढल्या; दिल्लीत किडनी रॅकेटचा पर्दाफाश

अवैध मानवी किडनीचा हे संपूर्ण रॅकेट बांगलादेशातून चालवले जात होते. पण ऑपरेशन्स भारतात होत होत होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 09, 2024 | 01:07 PM
photo credit : Social media

photo credit : Social media

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या रुग्णालयातील महिला डॉक्टरसह 7 जणांना अटक केली आहे. बांगलादेशपासून राजस्थानपर्यंत चालवण्यात येणाऱ्या या किडनी रॅकेटला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरने 15 ते 16 ऑपरेशन केले होते. अवैध मानवी किडनीचा हे संपूर्ण रॅकेट बांगलादेशातून चालवले जात होते. पण ऑपरेशन्स भारतात होत होत होते. राजस्थान पोलिसांनी बांगलादेशच्या या रॅकेटबाबत महत्त्वाचे खुलासे केले केल्यानंतर दिल्ली पोलिसांची क्राइम ब्रँचनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. दिल्ली क्राईम ब्रांचने केलेल्या तपासात एका मोठ्या रुग्णालयातील महिला डॉक्टरने नोएडा येथील रुग्णालयात 15 ते 16 प्रत्यारोपण केले होते.

या अवैध धंद्याचे पैसे या महिला डॉक्टरच्या खासगी सहाय्यकाच्या खात्यात यायचे आणि महिला डॉक्टर ते रोखीने काढत होती, असा आरोप आहे. यासाठी बांगलादेशातील रॅकेटचे लोक डायलिसिस सेंटरमध्ये जाऊन कोणत्या रुग्णाला किडनीची गरज आहे आणि त्याची क्षमता किती आहे हे पाहायचे. एखादा रुग्ण 25 ते 30 लाख रुपये द्यायला तयार झाला की त्याला भारतीय वैद्यकीय संस्थेमार्फत उपचारासाठी भारतात पाठवले जायचे.

त्यानंतर या रॅकेटचे लोक काही गरीब बांगलादेशींना पकडून पैशाचे आमिष दाखवून किडनी दान करण्यास तयार करायचे. मग ते त्यांनाही फसवून भारतात आणायचे आणि किडनीची गरज असलेल्या रुग्णाला आपले नातेवाईक म्हणायचे. त्यानंतर त्या व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून महिला डॉक्टरांच्या मार्फत त्याची किडनी काढली जायची.

या महिला डॉक्टरला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार दिवसांपूर्वी दिल्लीतूनच अटक केली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अपोलो रुग्णालयाने महिला डॉक्टरला निलंबित केले आहे.  तसेच काही देणगीदारांनी त्यांना नोकरीच्या नावाखाली भारतात आणले आणि नंतर त्यांची किडनी येथे काढण्यात आल्याचेही सांगितले.

महिला डॉक्टरची भूमिका समोर आल्यानंतर अपोलो रुग्णालयाकडून याप्रकरणी निवेदन जारी करण्यात आले आहे. महिला डॉक्टरची नियुक्ती रुग्णालयाच्या वेतनावर नसून तिच्या सेवेच्या बदल्यात शुल्काच्या आधारे करण्यात आली होती, असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. डॉक्टरांची सेवा निलंबित करण्यात आली आहे. हे काम अन्य कुठल्यातरी रुग्णालयातील महिला डॉक्टरने केल्याचेही रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्राथमिक तपासात, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल (IAH) मध्ये असे कोणतेही कृत्य घडलेले नसल्याचे समोर आले आहे.

 

Web Title: People were brought from bangladesh kidneys removed kidney racket busted in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • Delhi Police
  • New Delhi

संबंधित बातम्या

New Delhi Hit and Run: दिल्लीतील चाणक्यपुरीत हिट अँड रन: 26 वर्षीय तरूणाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले
1

New Delhi Hit and Run: दिल्लीतील चाणक्यपुरीत हिट अँड रन: 26 वर्षीय तरूणाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले

१८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू…, रेल्वेमंत्र्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील खरे कारण सांगितले
2

१८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू…, रेल्वेमंत्र्यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील खरे कारण सांगितले

Delhi Crime : दुहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली; तरुणी आणि ६ महिन्यांच्या मुलाला चाकूने भोसकलं
3

Delhi Crime : दुहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली; तरुणी आणि ६ महिन्यांच्या मुलाला चाकूने भोसकलं

“भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना… “; PM मोदींच्या इशाऱ्याने पाकिस्तानला भरली धडकी, पहा VIDEO
4

“भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना… “; PM मोदींच्या इशाऱ्याने पाकिस्तानला भरली धडकी, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.