नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. भारतीयांना त्रास देणाऱ्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही, असा कडक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानला कडक इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “भारतीय नागरिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही. दहशतवाद्यासाठी कोणतेही ठिकाण लपण्यासाठी सुरक्षित नसेल. दहशतवाद्यांना आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या लोकांना कधीच माफ केले जाऊ शकत नाही. त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल.”
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. मात्र ऑपरेशन सिंदूर संपले नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. पुन्हा असा हल्ल्या कोणालाही सोडले जाणार नाही असा इशारच भारताने दिलेला आहे. पाकिस्तान दहशतवादाच्या मदतीने भारताविरुद्ध प्रॉक्सी वॉर खेळत आहे.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनिर यांनी चिथावणीखोर भाषण दिल्यानंतर भारताच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला होता. त्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने अनेक आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. तर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये असणाऱ्या 9 पेक्षा जास्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “देशाच्या विकासासाठी सामाजिक, आर्थिक, लष्करी ताकद या सर्वांमध्ये आपल्याला सशक्त होयचे आहे. आज देश याच मार्गावर पुढे जात आहे. भारताची ताकद काय आहे हे जगाने नुकतेच पाहिले आहे. दहशतवादाविरुद्ध भारताची असलेली आपली कठोर भूमिका भारताने जगासमोर स्पष्ट केली आहे.
#WATCH | Delhi: At the centenary celebration of the historic conversation between Sree Narayana Guru & Mahatma Gandhi, PM says, "…Recently, the world saw India's capability. #OperationSindoor made India's firm policy against terrorism very clear before the world. We have shown… pic.twitter.com/dKGcGMQtQ8
— ANI (@ANI) June 24, 2025
‘Operation Sindoor’नंतर पाकिस्तानची मोठी कबुली
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर पाकिस्तानकडून एक महत्त्वाची आणि लाजिरवाणी कबुली समोर आली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी स्पष्ट केले आहे की, भारताच्या हवाई हल्ल्यांनंतर त्यांनी युद्धबंदीसाठी थेट भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क करण्यासाठी सौदी अरेबियाकडे विनंती केली होती. या घडामोडीमुळे दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाची मध्यस्थी महत्त्वाची ठरली होती, हे प्रथमच स्पष्ट झाले आहे.
‘Operation Sindoor’नंतर पाकिस्तानची मोठी कबुली; युद्धबंदीसाठी जयशंकर यांना केली होती विनंती
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने कठोर पवित्रा घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामुळे पाकिस्तानची मोठी अडचण झाली आणि त्यांनी प्रतिहल्ल्याची तयारी सुरू केली. मात्र, भारताने दुसऱ्यांदा नूर खान आणि शोरकोट या महत्त्वाच्या हवाई तळांवर हल्ला केल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला.