Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘यूसीसी’ला पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच विरोध; म्हटलं जातंय, ‘यूसीसी’मुळे आदिवासींच्या अधिकारांवर गदा येणार’

देशात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याबाबत चर्चाना जोर चढला असतानाच गुजरातमधील छोटा उदयपूर जिल्ह्यात मात्र आदिवासी संघटनांनी कडाडून (Oppose to UCC) विरोध केला आहे. याबाबत संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही सादर केले आहे. यात यूसीसी कायद्यामुळे आदिवासींच्या अधिकारांवर गदा येईल, असा दावा करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2023 | 07:53 AM
‘यूसीसी’ला पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच विरोध; म्हटलं जातंय, ‘यूसीसी’मुळे आदिवासींच्या अधिकारांवर गदा येणार’
Follow Us
Follow Us:

अहमदाबाद : देशात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याबाबत चर्चाना जोर चढला असतानाच गुजरातमधील छोटा उदयपूर जिल्ह्यात मात्र आदिवासी संघटनांनी कडाडून (Oppose to UCC) विरोध केला आहे. याबाबत संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही सादर केले आहे. यात यूसीसी कायद्यामुळे आदिवासींच्या अधिकारांवर गदा येईल, असा दावा करण्यात आला आहे.

यूसीसीच्या मुद्यावरून आदिवासी संघटनांनांच्या आंदोलनाला जिल्ह्यातील आम आदमी पक्षानेही पाठिंबा दिला आहे. निवेदन सादर करतेवेळी आपचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन राठवादेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात यूसीसी लागू करण्याबाबत विधान केल्यापासूनच येथे आंदोलन सुरू झाले आहे.

आंदोलनाचा इशारा

आदिवासी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात यूसीसी का लागू न करण्याची विविध कारणेही विषद केली. हा कायदा जर लागू करण्यात आला तर तीव्र आंदोलनही केले जाईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.

आदिवासी, ख्रिश्चनांचा समावेश न करण्याचे केंद्राचे आश्वासन

यूसीसीमधून काही आदिवासी आणि ख्रिश्चन समाजाला बाहेर ठेवण्याचा केंद्र सरकार कायदा मंत्रालयासोबत विचार करत असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागा नेत्यांच्या एका शिष्टमंडळाला दिले. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या शिष्टमंडळाने युसीसीच्या मुद्यावरून शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी यूसीसीच्या मुद्यासह भारत-नागा शांतता चर्चेसह राज्याच्या विविध समस्यांसंदर्भात चर्चाही केली.

नाराजी ओढवून घेणे योग्य नाही

यूसीसी लागू झाल्यास सर्वधर्मियांवर परिणाम होईल. हा कायदा लागू करणे कलम 370 रद्द करण्यासारखे सोपेही नाहीच. सर्वच धर्माचा यात समावेश असल्याने कुणाचीही नाराजी ओढवून घेणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने याबाबत योग्य ती पावले उचलावी.

– गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री.

Web Title: Peoples of gujrat are strongly opposes to law of ucc nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2023 | 07:53 AM

Topics:  

  • india
  • Modi government
  • uniform civil code

संबंधित बातम्या

‘माउंटेन मॅन’ दशरथ मांझी! केवळ छिन्नी-हातोड्याच्या बळावर २२ वर्षांत डोंगर फोडून रस्ता करणारा महामानव
1

‘माउंटेन मॅन’ दशरथ मांझी! केवळ छिन्नी-हातोड्याच्या बळावर २२ वर्षांत डोंगर फोडून रस्ता करणारा महामानव

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
2

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?
3

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?

Yash Toxic Movie: ‘टॉक्सिक’साठी यशला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन गेल्या गीतू मोहनदास; म्हणाला, “मला एक अ‍ॅक्टर म्हणून पुश केलं”
4

Yash Toxic Movie: ‘टॉक्सिक’साठी यशला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन गेल्या गीतू मोहनदास; म्हणाला, “मला एक अ‍ॅक्टर म्हणून पुश केलं”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.