Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सामान्य माणूस भरतो 25 कर; PM मोदींची करसुधारणांवर ‘ही’ मोठी घोषणा

Independence day 2025: लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून कर सुधारणांबाबत पंतप्रधान मोदींनी मोठी गोष्ट सांगितली आहे. एक सामान्य माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती कर भरतो ते जाणून घेऊया.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 15, 2025 | 02:01 PM
PM Modi announces major tax reforms common man pays 25 taxes daily

PM Modi announces major tax reforms common man pays 25 taxes daily

Follow Us
Close
Follow Us:

PM Modi tax reforms Diwali : ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या ऐतिहासिक क्षणी, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना थेट संबोधित करताना करसुधारणांबाबत मोठी घोषणा केली. “एक सामान्य भारतीय नागरिक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती कर भरतो, हे पाहिले तर तुम्ही थक्क व्हाल,” असे म्हणत त्यांनी दैनंदिन जीवनातील करव्यवस्थेवर भाष्य केले.

पंतप्रधानांनी यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’पासून अर्थव्यवस्थेतील सुधारणा, तसेच कर व्यवस्थेतील बदल अशा विविध मुद्द्यांचा वेध घेतला. त्यांनी सांगितले की, प्राप्तिकर कायद्यांमधून २८० हून अधिक कलमे वगळण्यात आली आहेत आणि कर प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी व्यापक बदल राबवले गेले आहेत. या पावलामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिवाळीपूर्वी जीएसटीमध्ये बदल

मोदींनी जाहीर केले की दिवाळीपर्यंत वस्तू आणि सेवा कर (GST) व्यवस्थेत “पुढील पिढीसाठी” सुधारणा केल्या जातील. यामुळे सामान्य ग्राहकांसह लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, तर व्यापाराचा खर्चही कमी होईल. परिणामी, अर्थव्यवस्थेतील गती वाढेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश

सामान्य माणसावर किती करांचा भार?

भारतामध्ये करांचे दोन प्रमुख प्रकार आहेत – प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर.

  • प्रत्यक्ष कर: सरकारकडून थेट आकारला जाणारा कर, जसे की उत्पन्नकर, शेअर्स/मालमत्तेतून मिळणाऱ्या नफ्यावरचा कर, वारसाहक्क कर आणि कॉर्पोरेट कर.
  • अप्रत्यक्ष कर: ग्राहकांनी वस्तू किंवा सेवांच्या खरेदीवेळी अप्रत्यक्षपणे भरलेले कर, जसे की जीएसटी, उत्पादन शुल्क, कस्टम शुल्क इत्यादी.

अहवालांनुसार, एक सामान्य भारतीय नागरिक दिवसभरात सुमारे २५ प्रकारचे कर भरतो. सकाळच्या चहाच्या कपापासून ते रात्रीच्या जेवणातील भाजीपर्यंत, प्रत्येक खरेदीत काही ना काही कराचा हिस्सा असतो.

भारताचा जागतिक करसंदर्भातील दर्जा

सध्याच्या आकडेवारीनुसार, भारतात १०० पैकी केवळ ७ मतदार नियमितपणे प्रत्यक्ष कर भरतात. तरीही, भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) अहवालानुसार, भारत लवकरच जर्मनीला मागे टाकून अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की कर हा केवळ महसूल गोळा करण्याचा मार्ग नाही, तर देशातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठीचे एक साधन आहे. “करदात्यांचा पैसा हा अशा लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांच्याकडे स्वतःचे उत्पन्न नाही. हीच सामाजिक न्यायाची खरी भावना आहे,” असे ते म्हणाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पची ‘राजकीय कारकीर्द’ संपवू शकतात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन; खळबळजनक व्हिडिओ आणि कागदपत्रे असल्याचा दावा

नव्या करव्यवस्थेकडून अपेक्षा

कर कायदे सुलभ करणे, अनावश्यक कलमे रद्द करणे आणि कर दर कमी करण्यासोबत पारदर्शकता वाढवणे हे पावले पुढील काही महिन्यांत अमलात येण्याची शक्यता आहे. यामुळे व्यवसाय करणे सोपे होईल, ग्राहकांवरील भार कमी होईल आणि कर भरणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदींनी केलेली ही घोषणा केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर ती भारताच्या आर्थिक भविष्याची दिशा ठरवणारी ठरू शकते.

Web Title: Pm modi announces major tax reforms common man pays 25 taxes daily

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • diwali special
  • Independence Day
  • Independence Day 2025
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ
1

उद्योगांना लाभदायक ठरणारी पहिली AI Living Lab महाराष्ट्रात; मंगल प्रभात लोढांच्या हस्ते शुभारंभ

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज
2

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
3

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव
4

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.