PM Narendra Modi as vishnu 11 th aavtar said by bjp leader raj purohit
Narendra Modi Vishnu Avatar : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून अनेक नवे विक्रम केले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाबाबत इंदिरा गांधी यांचा रेकॉर्ड मोडला आहे. त्यांची लोकप्रियता फक्त देशामध्ये तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आहे. आतामध्ये आता भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णुचे 11 वे अवतार असल्याचे वक्तव्य भाजप नेते राज पुरोहित यांनी केले आहे.
उज्ज्वल निकम यांना राज्यसभा खासदार हे पद मिळाल्यानंतर दादरमध्ये त्यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुतीसुमने गायली आहेत. यावेळी त्यांनी केलेल्या राजकीय भक्तीवरुन राज पुरोहित यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे देखील पंतप्रधान मोदी यांना मागील तीन महिन्यांपासून फोन करत असून मोदी फोन घेत नसल्याचे वक्तव्य राज पुरोहित यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले राज पुरोहित?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना भाजपा नेते राज पुरोहित यांनी त्यांचे जोरदार कौतुक केले आहे. राज पुरोहित म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही न थकणारे, न थांबणारे पंतप्रधान आहेत. यामुळे माझा आत्मा म्हणतो की ते विष्णूचे अकरावे अवतार आहेत. आपण अमेरिकेला जाऊन आलो की दोन दिवस जेट लॉक लागतो. त्यानंतर आपल्याला विश्रांती घ्यावी लागते. पण मोदी फिनलंड, इंग्लंड दौरा करून अहमदाबादमध्ये दोन दिवसांत २२ उद्घाटन करतात.” या आधी अवधूत वाघ यांनीही मोदींना विष्णूचे अवतार म्हणत त्यांचं कौतुक केलं होतं. त्याचबरोब खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मोदी हे विष्णूचा तेरावा अवतार आहेत म्हणत टीका करत असतात. दरम्यान राज पुरोहित यांच्या विधानाची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगलेली असते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हे सर्व मोदीमुळे शक्य झाले
पुढे भाजप नेते राज पुरोहित यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दाखला देत नरेंद्र मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींना गेल्या तीन महिन्यांपासून रोज फोनवर फोन करत आहेत. पण मोदी ट्रम्प यांचा फोन उचलत नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांची अवस्था वेड्यासारखी झाली. जो मोदीना नडेल तो मातीत मिसळेल. आपण ज्यावेळी राष्ट्राचा विचार करतो त्यावेळी पंतप्रधान कसा असावा? याची प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते आपल्या भारतीयांच्या मनातील पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे. इंग्लंडने आपठ्यावर दीडशे वर्षे राज्य केले आज ते आपल्यासोबत मुक्त व्यापार करार करतात हे मोदीमुळे शक्य झाले,” अशा शब्दांत भाजप नेते राज पुरोहित यांनी जोरदार पंतप्रधानांचे कौतुकस्तुमने गायली आहेत.