डीजिटल अरेस्टपासून कसा बचाव कराल? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागरून राहण्याचा सल्ला दिला.
इंटरनेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र इंटरनेटसोबत अनेक धोकेही निर्माण झाले आहेत. मोठी फरवणूक होत आहे. त्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनतेला जागरून राहण्याचा सल्ला दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी 115 व्या “मन की बात” कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी पीएम मोदींनी डीजिटल अरेस्ट फ्रॉडबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि लोकांना जागरूक केले. कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवण्यात आला ज्यात एक व्यक्ती पोलीस वेशात असून दुसऱ्या व्यक्तीकडून आधार कार्ड दाखवण्याची मागणी करत आहे.
एखादी व्यक्ती पोलीस ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून मेसेज पाठवतो किंवा थेट व्हीडिओ कॉल करतो. तुम्हाला ड्रग्स किंवा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी करतो. यातून पुढे मोठी फसवणूक केली जाते.
नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येक वयोमानानुसार, प्रत्येक वर्गातील लोक डीजिटल अरेस्टचे शिकार होत आहेत. लोकांनी भीतीमुळे त्यांच्या मेहनतीने कमावलेले लाखो रुपये गमावले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचा कॉल आला तर तुम्ही घाबरू नका. तुम्हाला माहित असायला हवे की कोणतीही तपास यंत्रणा फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे याप्रकारे चौकशी करत नाही.
आज digital arrest के शिकार होने वालों में हर वर्ग, हर उम्र के लोग हैं।
मैं आपको digital सुरक्षा के तीन चरण बताता हूं। ये तीन चरण हैं – ‘रुको-सोचो-Action लो’।
Call आते ही, ‘रुको’, घबराएं नहीं, शांत रहें, जल्दबाजी में कोई कदम न उठाएं, किसी को अपनी व्यक्तिगत जानकारी न दें, संभव… pic.twitter.com/tYjwXpFqaK
— BJP (@BJP4India) October 27, 2024
डिजिटल सुरक्षेचे तीन टप्पे पीएम मोदींनी सांगितले की, जर तुम्हाला अशा प्रकारचा डिजिटल अरेस्टसाठी फ्रॉड कॉल आला, तर तुम्ही सर्वप्रथम घाबरू नका. त्यांनी डिजिटल सुरक्षेचे तीन टप्पे स्पष्ट केले.
पीएम मोदींनी सांगितले की, अशा प्रसंगात शांत राहणे आवश्यक आहे, आणि कोणतेही पाऊल उचलताना घाई करू नका. तसेच तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. शक्य असल्यास स्क्रीनशॉट घेणे आणि रेकॉर्डिंग करणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यात, त्यांनी विचार करण्यावर जोर दिला, म्हणजे कोणतीही एजन्सी फोनवर अशी धमकी देत नाही, ना व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करते किंवा पैशांची मागणी करते. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर काहीतरी गडबड आहे हे समजून घ्या.
तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात, पीएम मोदींनी सांगितले की, तिसरा टप्पा म्हणजे क्रिया करा. राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर कॉल करा. तसेच सायबर क्राइमच्या वेबसाइटवर रिपोर्ट करा. कुटुंब आणि पोलिसांना सूचित करा.
अशा फ्रॉड करणाऱ्यांच्या हजारो व्हिडिओ आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. लाखो सिम कार्ड, बँक खात्यांना देखील ब्लॉक केले गेले आहे. पीएम मोदींनी सांगितले की, एजन्सी आपले कार्य करत आहेत, पण डिजिटल अरेस्टच्या नावाने होणाऱ्या स्कॅमपासून वाचण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जागरूकता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही या आव्हानाला तोंड देण्यासाठी #SAFEDIGITALINDIA हॅशटॅगसह तुमच्यासोबत घडलेल्या स्कॅमचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करा आणि अधिकाधिक लोकांना जागरूक करण्याचं आवाहन त्यांनी केलं.