नवी दिल्ली: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतून ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल सैन्य दलांचे अभिनंदन केले. तसेच विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या बालिशपणामुळे सैन्याचे मनोबल खचते आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच ऑपरेशन सिंदूरसाठी जगाने भारताला पाठिंबा दिला मात्र काँग्रेसने नाही अशी टीका मोदींनी केली आहे.
पहलगाम दहशवतादी हल्ल्यानंतर कोणत्याही देशाने पाकिस्तानचा निषेध नोंदवला नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतून म्हणाले, “आम्ही दहशतवादी आणि त्यांचे आका यांना संपवू असे सार्वजनिकपणे सांगितले. त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा भयानक शासन आम्ही करणार असे सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही लष्करी कारवाई केली आहे.”
“हल्ल्याची घटना कळताच मी तातडीने भारतात आलो आणि महत्वाची बैठक घेतली. यामध्ये दशतवाद्यांना योग्य तो धडा शिकवण्याचे निर्देश मी दिले होते. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. महाल आमच्या सैन्य दलांवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी सैन्य दलांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. आता कोणताही भारतविरोधी कारवाई करताना दहशतवादी अनेकदा विचार करतील, अशी शिक्षा आपणं त्यांना दिली आहे,” असे मोदी म्हणाले.
“जगातील कोणत्याही देशाने भारताला कारवाई करण्यापासून रोखले नाही. १९३ पैकी केवळ ३ देश पाकिस्तानचे समर्थन करत होते. जगभरातील देशांचे भारताला समर्थ मिळाले. मात्र वाईट गोष्ट म्हणजे माझ्या शूरवीरांना काँग्रेसचे समर्थ मिळाले नाही. २२ एप्रिलनंतर हे लगेच उड्या मारत होते. मोदी कुठे गेले, कुठे गेली ५६ इंचाची छाती म्हणून.. पहलगामच्या हत्या झालेल्या निर्दोष लोकांमध्ये देखील ते राजकारण पाहत होते. २६/११ च्या हल्ल्यानंतर देखील काँग्रेसचा पाकिस्तानसोबत संवाद होता.भारत हा युद्धाचा नाही तर बुद्धांचा देश आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमची जगभरात चर्चा होते आहे. भारत महापुरुषांचा देश आहे. संरक्षण बाजारपेठेत भारताने आपला ठसा उमटवला आहे., ” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले आहेत.
PM Narendra Modi Live: “मी सभागृहात भारताच्या…”; ‘ऑपरेशन सिंदूर’वरून मोदींचा विरोधकांना सणसणीत टोला
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही ठरवलेले टार्गेट १०० टक्के पूर्ण केले. १० आणि ११ मे रोजी कायम लक्षात राहील असा धडा पाकिस्तानला शिकवलं आहे. आम्हाला जगाचा पाठिंबा मिळाला, मात्र काँग्रेसचा नाही. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान गुडघ्यावर आला. आता हल्ले थांबवा अशी याचना पाकिस्तान करत होता. भारताच्या हल्ल्यानंतर पक्षितांनी डीजीएमओचा फोन आला होता.