PM मोदी थेट 'या' एअरबेसवर दाखल; आता पाकड्यांच खरं नाही! पुढचं पाऊल...
PM Narendra Modi: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलं. ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना चांगलीच अद्दल घडवली. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. काल नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट आदमपूर एअरबेसवर दाखल झाले आणि शूर जवानांची भेट घेतली.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पंजाबमधील आदमपूरच्या एअरबेसला भेट दिली. कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान मोदी हे एअरबेसवर दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या शूर जवानांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांचे कौतुक देखील केले. आदमपूर येथे भारताचे मिग 29 ही लढाऊ विमाने तैनात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या शूर जवानांचे कौतुक केले आहे.
अखेर पाकिस्तानने मान्य केलंच…
युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी पाकिस्तानने भारतीय सैन्याकडून झालेल्या मिसाईल हल्ल्यांच्या नुकसानीची माहिती दिली आहे. पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत त्यांचे ११ सैनिक मारले गेल्याचे आणि ७८ सैनिक गंभीर जखमी झाल्याचे मान्य केलं आहे. याशिवाय, गोळीबारात ४० नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाचेही मोठे नुकसान झाल्याचेही पाकिस्तानकडून मान्य करण्यात आले आहे.
Earlier this morning, I went to AFS Adampur and met our brave air warriors and soldiers. It was a very special experience to be with those who epitomise courage, determination and fearlessness. India is eternally grateful to our armed forces for everything they do for our nation. pic.twitter.com/RYwfBfTrV2
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025
पाकिस्तानी सैन्याच्या म्हणण्यानुसार, नियंत्रण रेषेवरून झालेल्या गोळीबारात लष्करी जीवितहानी व्यतिरिक्त अनेक नागरिकही जखमी झाले. आयएसपीआरच्या निवेदनानुसार, सात महिला आणि १५ मुलांसह ४० नागरिक ठार झाले, तर २७ मुले आणि १० महिलांसह १२१ जण जखमी झाले. भारतीय हल्ल्यांमध्ये पाकिस्तानला झालेल्या नुकसानीचा आणखी एक पुरावा समोर आला आहे, जिथे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर रावळपिंडीतील एका रुग्णालयात भेट देत आहेत आणि जखमी लष्करी जवानांना भेटत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.
काय आहे पहलगाम हल्ला प्रकरण?
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी २८ निष्पाप नागरिकांना मारले होते. त्यानंतरभारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावरच हल्ले करले. मात्र भारताने सर्व हल्ले परतवून लावले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर देशवासियांना संबोधित केले.