
Pakistan Lobbying the US
ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?
फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन ॲक्ट FARA च्या कागदपत्रांनुसार, भारताच्या लष्करी कारवाईच्या भितीने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने अमेरिकेकडे कोटींचे लॉबिंग केले होते. अमेरिकेवर भारतील कारवाईला रोखण्यासाठी दबाव आणण्याचा याचा उद्देश होता. यासाठी पाकिस्तानचे राजदूत आणि संरक्षण अटॅची यांनी अमेरिकन काँग्रेस, पेंटागॉन, परराष्ट्र विभाग, आणि अनेक मिडिया हाऊससोबत महत्त्वाच्या ५० हून अधिक बैठका घेतल्या होत्या.
तसेच इ-मेल, फोन आणि प्रत्यक्ष भेटी करुन अमेरिकेवर दबावाचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता. यासाठी पाकिस्तानने भारतापेक्षा तीन पट पैसा खर्च केला. अहवालानुसार, पाकिस्तानने अमेरिकेतली सहा लॉबिंग फर्म्ससोबत ५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे ४१ कोटींचा करार केला होता. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या बैठकीचाही समावेश होता. लॉबिंगमध्ये पाकिस्तानने प्रादेशिक सुरक्षा, काश्मीर, दुर्मिळ खनिजे आणि द्विपक्षीय संबंधाच्या मुद्द्यांचा डाव फेकला होता.
पाकिस्तानला अमेरिकेने हस्तक्षेप करुन भारताची लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती केली होती. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानवर प्रचंड लष्करी दबाव वाढला होता. यामुळे पाकिस्तानने अमेरिकेशी संबंध सुधारण्यावर भर देत अमेरिकेला रिश्वत दिली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शिवाय पाकिस्तानने नोबेल पुरस्कारासाठी (Nobel Prize) ट्रम्प यांची शिफारसही केली होती.
२२ एप्रिल २०२५ रोजी भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ निरापराध लोकांचा बळी गेला होता. या हल्ल्यामुळे भारतामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरण्यात आले होते. भारताने यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर हल्ले सुरु केले होते. ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानचा सर्वात महत्त्वाचे एअरबेस नूर ए खान नष्ट केला होता. तसेच यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पुराव्यांसह भारताची दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याची पोल खोलली होती.
‘भारत हिंमत करणार नाही…’ ; Operation Sinddor 2.0 वर दहशतवादी हाफिज सईदची पोकळ धमकी, VIDEO
Ans: भारताच्या लष्करी कारवाईच्या भितीने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने अमेरिकेकडे ४० कोटींचे लॉबिंग केले होते.
Ans: पाकिस्तानने लॉबिंगसाठी प्रचंड पैसा अमेरिकेला दिला. तसेच ५० हून अधिक उच्चस्तरीय बैठकांचे, ट्रम्पसोबत मुनीरच्या बैठकांचे आयोजन केले. तसेच प्रादेशिक सुरक्षा, काश्मीर, दुर्मिळ खनिजे आणि द्विपक्षीय संबंधाच्या मुद्द्यांचा वापर लॉबिंग करण्यासाठी केला.
Ans: पाकिस्तानने लॉबिंगमध्ये अमेरिकेला भारतावर लष्करी कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणण्याची विनंती केली होती.