Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi : सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा ‘पुअर लेडी’ असा उल्लेख; PM मोदी कडाडले

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण झालं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी, राष्ट्रपती यांची भाषण करता करता चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या”, अशी टीका सोनिया गांधी यांनी

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 31, 2025 | 10:30 PM
सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा 'पुअर लेडी' असा उल्लेख; PM मोदी कडाडले

सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा 'पुअर लेडी' असा उल्लेख; PM मोदी कडाडले

Follow Us
Close
Follow Us:

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण झालं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी, राष्ट्रपती यांची भाषण करता करता चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या”, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. त्यावर टीकेची झोड उठली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला असून माफीची मागणी केली आहे. राष्ट्रपती कार्यालयातूनही सोनिया गांधींचं विधान अस्वीकार्य आहे, असं सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषणावेळी थकल्या होत्या असं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. त्यावर आता भाजपनं टीकास्त्र सोडलं आहे. सोनिया गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या वक्तव्याने सर्व मर्यादा संपुष्टात आल्या आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य खरंतर टाळता आलं असतं. राष्ट्रपती भवनच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे राष्ट्रपती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

काय म्हणाल्या सोनिया गांधी?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना ‘पुअर लेडी’ असं संबोधलं. भाषणावेळी त्या खूपच थकलेल्या दिसल्या. बोलताना त्या अडखळत होत्या, असं सोनिया गांधी म्हणाल्य़ा. त्यानंतर भाजपकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या द्वारकामध्ये निवडणूक प्रचारसभेत बोलताना मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणाचं कौतुक केलं, तर दुसरीकडे सोनिया गांधी यांचे वक्तव्य अपमान करणारे असल्याचं म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेला संबोधित केले. त्या ओडिशाच्या जंगलातील आदिवासी कुटुंबातून इथपर्यंत पोहोचल्या आहेत. हिंदी ही त्यांची मातृभाषा नाही. त्या उडिया भाषा बोलतात. मातृभाषा नसूनही त्यांनी हिंदीत खूप चांगल्या पद्धतीने भाषण केलं आणि सगळ्यांना प्रेरित केले. मात्र, गांधी या राष्ट्रपतींना गरीब आणि थकलेल्या म्हणाल्या.

त्यांना आदिवासी मुलीचं बोलणं कंटाळवाणं वाटतं. हा देशातील १० कोटी आदिवासी बंधू-भगिनींचा अवमान आहे. काँग्रेसच्या या शाही कुटुंबाला तळागाळातून आलेले लोक आवडत नाहीत. गरीब, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे लोक पुढे जात आहेत, पण त्यांना पावलोपावली अपमानित केलं जातं. या लोकांना शिवीगाळ करणं, देशाची बदनामी करणं, अर्बन नक्षलवादाच्या गोष्टी करणं यांना अधिक चांगलं वाटतं. या लोकांपासून खूप सावध राहायला हवं, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

Web Title: Pm narendra modi reaction on sonia gandhi statement on president droupadi murmu budget 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 10:29 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • President Droupadi Murmu
  • sonia gandhi news

संबंधित बातम्या

एप्सटिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव म्हणून प्रत्येक देश त्यांच्यावर दबाव टाकतोय, प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने खळबळ
1

एप्सटिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव म्हणून प्रत्येक देश त्यांच्यावर दबाव टाकतोय, प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने खळबळ

India-Cyprus: भारताच्या युवा शक्तीला मिळणार जागतिक ओळख! मोदी-निकोस यांच्यातील ‘या’ कराराने तरुणांसाठी नोकऱ्यांची सुवर्णसंधी
2

India-Cyprus: भारताच्या युवा शक्तीला मिळणार जागतिक ओळख! मोदी-निकोस यांच्यातील ‘या’ कराराने तरुणांसाठी नोकऱ्यांची सुवर्णसंधी

“पंतप्रधान मोदी, अमित शहा देशाचे गद्दार,” राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशभरात खळबळ
3

“पंतप्रधान मोदी, अमित शहा देशाचे गद्दार,” राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशभरात खळबळ

MELODI : ‘परिश्रम ही सफलता की कुंजी…’ जेव्हा इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी मोदींना हिंदीत ऐकवला गुरुमंत्र, VIDEO VIRAL
4

MELODI : ‘परिश्रम ही सफलता की कुंजी…’ जेव्हा इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी मोदींना हिंदीत ऐकवला गुरुमंत्र, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.