
MP Sanjay Raut target PM Narendra Modi over women reservation bill marathi political news
देशात सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने होत असल्याचे चित्र आहे. दिल्ली आणि मुंबईत पोलिसांकडून आंदोलकांची मोठ्या प्रमाणात धरपकड होत असल्याचे दिसत आहे. आंदोलनकर्त्यांवर होत असलेल्या पोलिसी कारवायांमुळे मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळातदेखील विरोधकांकडून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार हल्लाबोल होत आहे. अश्यातच. शिवसेना ठाकरे गटाचाही खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. (Sanjay Raut)
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ‘नरेंद्र मोदी येत्या मार्च महिन्यापर्यंत सत्तेवर राहणार नाहीत,’ असे खळबळजनक भाकीत केले आहे. आज (रविवार, 11 ऑकटोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे भाष्य केले.
संजय राऊत यांनी भाजपमधील कथित अंतर्गत मतभेदांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. भाजपचे चार मोठे नेते सध्या वेगळ्या मनस्थितीत असून, त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका मोठ्या नेत्याचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला.
आगामी काळात भाजपमधील अनेक नेते मोदी आणि शाह यांच्यापासून दूर जातील, असंही राऊत म्हणाले. येत्या सहा ते सात महिन्यांत मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील, असं भाकीत त्यांनी व्यक्त केलं.
दिल्लीतील CJP आंदोलन आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवरूनही राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. हा विषय केवळ एका संघटनेपुरता मर्यादित नसून देशातील लोकशाहीशी संबंधित असल्याचं ते म्हणाले.
दिल्ली पोलिसांकडून माजी मुख्यमंत्री आणि खासदारांना ताब्यात घेतलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका केली. मोदी आणि शाह यांच्या निवासस्थानांभोवती कडक सुरक्षा व्यवस्था असल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला.
मुंबईतील आंदोलनादरम्यान महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना अटक केल्याच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. तुषार गांधी यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.
भाजपला मिळणाऱ्या निधीवरूनही संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. भाजपला कोणाकडून आर्थिक मदत मिळाली, याची माहिती समोर यावी, अशी मागणी करत त्यांनी पीएम फंड आणि मतचोरीच्या आरोपांचाही उल्लेख केला.
दरम्यान, मोदी यांच्या सत्तेबाबतचा दावा, भाजपमधील कथित मतभेद आणि निधीबाबतचे आरोप यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Ans: संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी येत्या मार्च महिन्यापर्यंत सत्तेवर राहणार नाहीत, असा दावा केला.
Ans: भाजपमध्ये अंतर्गत मतभेद वाढले असून पक्षातील काही मोठे नेते मोदी आणि अमित शाह यांच्यापासून दूर जाऊ शकतात, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
Ans: आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवरून राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.