Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत

Raj Thackeray : दिल्लीतील SIR विरोधी आंदोलन आणि कॉकरोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेवरून राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी आंदोलनाचा अधिकार हिरावून घेण्यावर प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Oct 10, 2026 | 04:39 PM
Raj Thackeray

Raj Thackeray

Follow Us
Follow Us:
  • अभिजीत दीपकेंच्या अटकेवरून राज ठाकरे आक्रमक
  • ‘या देशात आंदोलनं करायचीच नाहीत का?’ राज ठाकरेंचा सवाल
  • मोदी-शाहांवर हुकूमशाहीचा आरोप; निवडणूक आयोगावरही निशाणा
 

Raj Thackeray : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात जोरदार आंदोलन सत्र चालू आहे. राजधानी दिल्लीत आधी AISF कडून आणि त्यानंतर INDIA आघाडीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. आज (शनिवार, 10 ऑकटोबर) कॉकरोच जनता पार्टीकडून जंतर मंतर येथे आंदोलन पार पडणार होते. पण त्यापूर्वीच, दिल्ली पोलिसांनी CJP च्या अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासह इतर CJP पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावरून आता देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अश्यातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर मोठी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडत “मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे,” असे विधान केले आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून सद्यस्थितीवर भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “No nation can be grateful at the cost of its liberty” हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते. एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.”

CJP Protest Live Updates: अभिजीत दीपकेंच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेकडे!; व्हिडिओ संदेशातून मोठी घोषणा

“हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे !”

‘या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत का ?’ राज ठाकरेंचा सवाल

“या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.”

“आज दिल्लीत आंदोलनं होतील या भीतीने दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही कोणती पद्धत ? देशातील २०,३० वर्षांचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत ? ही असली लोकशाही?”

“मला समजत नाही या ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का ? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून ? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्या प्रमुखाने काही गोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय ? माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा ? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर आत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून!”

“भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) यानुसार नागरिकांना शांततेत निदर्शनं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला का चिरडायचा आहे ? काल तर चक्क माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विचारलं, माशी मारायला हातोडा कशाला वापरताय ?. बरं आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं असं सहसा महाराष्ट्रात पोलीस डिपार्टमेंट करतं. आणि हे करताना नागरिकांच्या संविधानिक अधिकारांना धक्का बसणार नाही हे पाहतात. पण इथे दिल्लीत तर महिला पत्रकार ज्या हे आंदोलन कव्हर करत होत्या, त्यांच्या तक्रारी आहेत की पोलिसांनी स्थानबद्ध केल्यावर त्यांचा छळ केला म्हणून. जर आंदोलन कव्हर करणाऱ्यांचा छळ होत असेल तर आंदोलकांना नीट वागवतील याची काय खात्री ?”

“या देशातील तरुणांनी तुम्हाला झुकवलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला हा राग अजून शमला नाहीये असं दिसतंय. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळेस मोदी-शाह गुजरातमध्ये आंदोलनं होऊ देत होते कारण ती फायद्याची होती. पण त्याच गुजरातमध्ये त्यांनी सत्तेच्या काळात त्यांच्या सरकारच्या विरोधातील अनेक आंदोलनं चिरडली. थोडक्यात हे बेगडी आणि दुटप्पी आहेत हे स्पष्ट दिसतंय.”

“नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंट्री आहे, How to Become a Tyrant (tyarant म्हणजे जुलमी शासक ) ही डॉक्युमेंट्री बहुदा अमित शाह रोज गांभीर्याने बघत आहेत असं दिसतंय. त्यापेक्षा ज्या गुजरातमधून तुम्ही येता त्याच राज्यातून आलेल्या महात्मा गांधींनी शांततेतली केलेल्या आंदोलनांबद्दल आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल जरा वाचा. अर्थात यांच्याकडून मी अपेक्षा का बाळगतोय हेच समजत नाही ! असो…”

“आज आपण सत्तेत आहोत म्हणजे अनंत काळापर्यंत असू ही अपेक्षा बाळगू नका. तुम्ही काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही आहात. जेव्हा सत्तेतून एखादा हुकूमशाही मानसिकतेचा सत्ताधारी जातो त्यानंतर त्याची जनताच कशी पळताभुई करतात याची जगभरातील उदाहरणं आठवा. जगभरातील सोडा भारताचा इतिहास वाचलात तरी कळेल जिथे मुघलांपासून, पोर्तुगीजांपासून ते आमच्या साम्रज्यावरचा सूर्य मावळत नाही असा माज करणाऱ्या ब्रिटिशांचा जिथे या देशाने माज उतरवला, तिथे स्वकीयांचा माज इथली जनता उतरवणार नाही, असं वाटतंय का तुम्हा सत्ताधाऱ्यांना ? सरकार म्हणून तुमच्याकडून मॅच्युरिटीची अपेक्षा आहे, ती नसेलच तर शिकून घ्या, आत्मसात करा. आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आणि तो अबाधितच राहिला पाहिजे हे निश्चित !” असे ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या या पोस्टमुळे SIR प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय वादाला आणखी धार मिळाली आहे. दिल्लीतील आंदोलन, CJP पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची घटना आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन

Web Title: Raj thackeray criticizes modi shah cjp abhijit dipke arrest sir protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • Amit Shah
  • CJP Protest
  • MNS
  • PM Narendra Modi
  • raj thackeray

संबंधित बातम्या

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन
1

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन

Delhi Protest News: दिल्लीत हाय अलर्ट! सुरक्षेसाठी हजारो जवान तैनात, अनेक ट्रेन, मेट्रो आणि शाळा बंद
2

Delhi Protest News: दिल्लीत हाय अलर्ट! सुरक्षेसाठी हजारो जवान तैनात, अनेक ट्रेन, मेट्रो आणि शाळा बंद

राजधानी दिल्लीत येणाऱ्या तब्बल 250 ट्रेन्स रद्द, इंटरनेटसह 45 मेट्रो स्टेशन्सही बंद; CJP च्या आंदोलनाला बसणार फटका?
3

राजधानी दिल्लीत येणाऱ्या तब्बल 250 ट्रेन्स रद्द, इंटरनेटसह 45 मेट्रो स्टेशन्सही बंद; CJP च्या आंदोलनाला बसणार फटका?

CJP Protest : दिल्ली राडा होणार! आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची 35 हजारांची फौज तैनात; CCTV, ड्रोन आणि FRS चा करणार वापर
4

CJP Protest : दिल्ली राडा होणार! आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची 35 हजारांची फौज तैनात; CCTV, ड्रोन आणि FRS चा करणार वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.