Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM नरेंद्र मोदींचे खास Christmas सेलिब्रेशन; दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला दिली भेट, पहा खास फोटो

PM Modi at Church : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिसमस सण साजरा केला आहे. दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट देत पंतप्रधान मोदींनी ख्रिसमस साजरा केला आहे आणि प्रार्थना केली.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 25, 2025 | 11:05 AM
PM Narendra Modi visit Cathedral Church in Delhi offering prayers and celebrated Christmas

PM Narendra Modi visit Cathedral Church in Delhi offering prayers and celebrated Christmas

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाताळनिमित्त चर्चला भेट
  • दिल्लीतील कॅथेड्रल चर्चमध्ये PM मोदींनी केली प्रार्थना
  • पंतप्रधान मोदींनी सर्व ख्रिश्चन बांधवांना दिल्या शुभेच्छा
PM Modi at Church : नवी दिल्ली : आज सर्वत्र नाताळ हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. ख्रिश्चन बांधव आनंदांच्या वातावरणात ख्रिसमस सण साजरा करत आहेत. यानिमित्ताने देशातील चर्च आकर्षकरित्या सजवण्यात आले असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केक, पेस्ट्री आणि गिफ्ट वाटून हा आनंद साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नाताळ सणामध्ये सामील झाले आहेत.

दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट देत पंतप्रधान मोदींनी ख्रिसमस साजरा केला आहे. यावेळी चर्चेमधील काही फोटो पंतप्रधान मोदींनी शेअर केले आहेत. दिल्लीतील कॅथेड्रल चर्च हे सर्वात जुन्या चर्चपैकी एक असून दिल्लीतील सर्वात मोठे चर्च देखील आहे. कॅथेड्रल चर्च त्याच्या सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते. दरवर्षी नाताळासाठी विशेष सजावट केली जाते. संपूर्ण दिल्लीतील ख्रिश्चन बांधव या चर्चेमध्ये सण साजरा करण्यात येत असतात. कॅथेड्रल चर्च उत्कृष्ट वास्तूकलेपैकी एक मानले जाते. यंदाच्या वर्षी पंतप्रधान मोदी हे देखील चर्चमध्ये सामील झालेले दिसून आले. यावेळी पंतप्रधान मोदी हे खास पोषाखामध्ये चर्चमध्ये गेलेले दिसून आले.यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्याचबरोबर मोदींनी चर्चमध्ये प्रार्थना देखील केली.

हे देखील वाचा : 101व्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त लखनौ ‘अटलमय’; PM मोदींच्या हस्ते 230 कोटींच्या ‘राष्ट्र प्रेरणा स्थळा’चे लोकार्पण

चर्चमध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रार्थना देखील केली. त्याचबरोबर सोशल मीडियावर या भेटीचे फोटो देखील शेअर केले आहे. खास क्षण शेअर करत पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, दिल्लीतील ‘कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्प्शन’ येथे ख्रिसमसच्या सकाळच्या प्रार्थनेत सहभागी झालो. या प्रार्थनेत प्रेम, शांती आणि करुणेचा कालातीत संदेश प्रतिबिंबित झाला. ख्रिसमसची भावना आपल्या समाजात सलोखा आणि सदिच्छांना प्रेरणा देवो, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.

Attended the Christmas morning service at The Cathedral Church of the Redemption in Delhi. The service reflected the timeless message of love, peace and compassion. May the spirit of Christmas inspire harmony and goodwill in our society. pic.twitter.com/humdgbxR9o — Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025

याचबरोबर देशातील सर्व ख्रिश्चन बांधवांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना शांती, करुणा आणि आशेने भरलेल्या आनंददायी नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. येशू ख्रिस्तांची शिकवण आपल्या समाजात सलोखा दृढ करो, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळ सणाच्या दिल्या आहेत.

हे देखील वाचा : केवळ फॅशन नाही तर बिझनेस मास्टरस्ट्रोक; सांताक्लॉजला खरं तर ‘Coca-Cola’ मुळे मिळाला लाल रंगाचा ड्रेस

Here are some more glimpses from the Christmas morning service at The Cathedral Church of the Redemption. pic.twitter.com/ta5vTyYEJU — Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025

Web Title: Pm narendra modi visit cathedral church in delhi offering prayers and celebrated christmas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • Christmas
  • Delhi news
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

ओव्हन- केक मोल्डमचा वापर न करता लहान वाट्यांमध्ये बनवा स्वादिष्ट कप केक, नोट करून घ्या इन्स्टंट रेसिपी
1

ओव्हन- केक मोल्डमचा वापर न करता लहान वाट्यांमध्ये बनवा स्वादिष्ट कप केक, नोट करून घ्या इन्स्टंट रेसिपी

Atal Jayanti: 101व्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त लखनौ ‘अटलमय’; PM मोदींच्या हस्ते 230 कोटींच्या ‘राष्ट्र प्रेरणा स्थळा’चे  लोकार्पण
2

Atal Jayanti: 101व्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त लखनौ ‘अटलमय’; PM मोदींच्या हस्ते 230 कोटींच्या ‘राष्ट्र प्रेरणा स्थळा’चे लोकार्पण

Christmas 2025 : सणानिमित्त घरी बनवा टेस्टी सर्वांच्या आवडीचा ‘रेड वेल्व्हेट केक’, रेसिपी नोट करा
3

Christmas 2025 : सणानिमित्त घरी बनवा टेस्टी सर्वांच्या आवडीचा ‘रेड वेल्व्हेट केक’, रेसिपी नोट करा

Christmas 2025:  केवळ फॅशन नाही तर बिझनेस मास्टरस्ट्रोक; सांताक्लॉजला खरं तर ‘Coca-Cola’ मुळे मिळाला लाल रंगाचा ड्रेस
4

Christmas 2025: केवळ फॅशन नाही तर बिझनेस मास्टरस्ट्रोक; सांताक्लॉजला खरं तर ‘Coca-Cola’ मुळे मिळाला लाल रंगाचा ड्रेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.