देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती
पंतप्रधान मोदी करणार पुग्रस्त राज्यांचा दौरा
आज देखील अनेक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा
PM Narendra Modi: देशभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली या राज्यात पुरस्थिती निर्माण झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्रिय झाले आहेत. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त राज्यांचा दौरा करणार आहेत.
उत्तर भारतातील अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन बचाव कार्य करत आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरबाधित राज्यांचा दौरा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. पुरामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले आहे. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच पूरग्रस्त राज्यांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे बचाव कार्यात वेग येण्यास फायदा होणार आहे.
पंजाबमध्ये महापूर
पंजाब राज्यात जोरदार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पुर आला आहे. महापुरामुळे अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 1900 पेक्षा जास्त गावे पाण्याखाली गेली आहेत. 23 जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. 3 लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रभावित झाले आहेत. दीड लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. 20 हजार पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
IMD Rain Alert: आज सगळीकडे दाणादाण! पावसाचा मोर्चा ‘या’ राज्यांकडे वळला; अलर्ट वाचून म्हणाल…
गुजरात राज्याला महापुराचा धोका
गुजरातमध्ये नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. सुरतमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे किम नदी इशारा पातळीच्यावरून वाहत आहे. ज्यामुळे अनेक गावात पाणी शिरले आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे वडोदरामध्ये नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवर धरणातून साडेचार लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नर्मदा नदीकाठच्या गावांमध्ये महापुराचा धोका निर्माण झाला आहे. बडोदरा जिल्ह्यातील मल्हार घाटाच्या ९० पेक्षा जास्त पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. नर्मदा नदीने अजून इशारा पातळी ओलांडली नसली तरी पावसाचा जोर पाहता लवकरच नदी ती पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.