देशभरात मुसळधार पावसाचा इशार (फोटो- ani)
देशभरात पावसाचा जोर वाढणार
बिहार, झारखंडमध्ये पावसाचा अलर्ट
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Heavy Rain Alert To India: गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने आज देशभरात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. राजधानी दिल्लीत यमुना नदी अजूनही इशारा पातळीवरून वाहत आहे. अनेक भागात यमुनेचे पाणी शिरले आहे. पंजाबमध्ये देखील पुरस्थिती कायम आहे. हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आज कोणत्या राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे, ते जाणून घेऊयात.
आज देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील राज्यात आणि दक्षिण भारतात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवमान विभागाने बिहार, झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
गुजरात राज्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. सरदार सरोवर धरणातून साडेचार लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राजस्थानमध्ये आज व उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम राजस्थानमध्ये देखील हवामन विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवस उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आजपासून 9 तारखेपर्यंत उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. पंजाबमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. पुरस्थिती पंजाबमध्ये अजूनही कायम आहे.
गुजरात राज्याला महापुराचा धोका
गुजरातमध्ये नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. सुरतमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे किम नदी इशारा पातळीच्यावरून वाहत आहे. ज्यामुळे अनेक गावात पाणी शिरले आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे वडोदरामध्ये नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवर धरणातून साडेचार लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नर्मदा नदीकाठच्या गावांमध्ये महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
बडोदरा जिल्ह्यातील मल्हार घाटाच्या ९० पेक्षा जास्त पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. नर्मदा नदीने अजून इशारा पातळी ओलांडली नसली तरी पावसाचा जोर पाहता लवकरच नदी ती पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरातमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान गुजरात सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.