Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर; पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर

वाळू, सिमेंट यांसारख्या बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवरही निर्बंध असतील. स्टोन क्रशर, खाणकाम आणि प्रदूषणकारी हॉटमिक्स प्रकल्प बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2026 | 03:23 PM
राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर; पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर

राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर; पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली-एनसीआरमध्ये दिवाळीपूर्वीच प्रदूषणाचा कहर
  • दिल्लीचा AQI ३८२ वर पोहोचला
  • हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर
नवी दिल्ली : दिवाळीपूर्वीच दिल्ली-एनसीआरमधील वायुप्रदूषणाने गंभीर वळण घेतले आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४०० च्या जवळ पोहोचल्याने हवेची गुणवत्ता खालावली आहे. राजधानी दिल्लीतील AQI ३८२ नोंदवण्यात आला. या पार्श्वभूमीवर वायुगुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (सीएक्यूएम) दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचा (ग्रॅप) तिसरा टप्पा लागू केला आहे. त्यामुळे बांधकामे, वाहनांची वाहतूक आणि औद्योगिक कामकाजावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

ग्रॅप-३ अंतर्गत अनावश्यक बांधकाम आणि पाडकामाच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. माती खोदणे, पायाभरणीसाठी पाइलिंग, खंदक खोदणे आणि रेडीमिक्स काँक्रिट प्रकल्पांमधील काही कामेही बंद राहणार आहेत. वाळू, सिमेंट यांसारख्या बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवरही निर्बंध असतील. स्टोन क्रशर, खाणकाम आणि प्रदूषणकारी हॉटमिक्स प्रकल्प बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. आंतरराज्यीय डिझेल बसनाही दिल्लीमध्ये प्रवेश करता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता डिझेल जनरेटरच्या वापरावरही निर्बंध असतील.

शाळांचे ऑनलाईन वर्ग

प्रदूषणाचा मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन पाचवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवून ऑनलाईन वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठी घरून काम किंवा संमिश्र कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ग्रॅपमध्ये प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार चार टप्पे आहेत.

आयोगाकडून प्रतिबंधात्मक निर्णयाची शक्यता

एक्यूआय २०१ ते ३०० असताना पहिला, ३०१ ते ४०० असताना दुसरा, ४०१ ते ४५० असताना तिसरा आणि ४५० पेक्षा अधिक झाल्यास चौथा टप्पा लागू होतो. मात्र, प्रदूषणाचा अंदाज आणि परिस्थिती लक्षात घेऊन आयोग प्रतिबंधात्मक निर्णय घेऊ शकतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

FAQ

1. दिल्लीतील वायुप्रदूषणाची स्थिती किती गंभीर आहे?
दिवाळीपूर्वीच दिल्ली-एनसीआरमधील वायुप्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले असून, दिल्लीचा AQI ३८२ नोंदवण्यात आला आहे.

2. दिल्ली-एनसीआरमध्ये कोणता GRAP टप्पा लागू करण्यात आला आहे?
वायुगुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) GRAPचा तिसरा टप्पा लागू केला आहे.

3. GRAP-3 अंतर्गत कोणत्या कामांवर बंदी आहे?
अनावश्यक बांधकाम व पाडकाम, माती खोदणे, पायाभरणीसाठी पाइलिंग, खंदक खोदणे आणि रेडीमिक्स काँक्रिट प्रकल्पांमधील काही कामांवर निर्बंध आहेत.

Web Title: Pollution crisis in capital delhi holidays announced for schools up to class 5 nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Air Pollution
  • Delhi news

संबंधित बातम्या

Delhi Gaffar Market Fire: दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमधील दुकानातून भडकलेल्या आगीने काही वेळातच धारण केले रौद्र रूप!
1

Delhi Gaffar Market Fire: दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मार्केटमधील दुकानातून भडकलेल्या आगीने काही वेळातच धारण केले रौद्र रूप!

Delhi Building Collapse: दिल्लीतील चावडी बाजारात भीषण दुर्घटना; तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, NDRF घटनास्थळी
2

Delhi Building Collapse: दिल्लीतील चावडी बाजारात भीषण दुर्घटना; तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, NDRF घटनास्थळी

Mumbai News: वायुप्रदूषणावरून सदस्य प्रचंड आक्रमक! नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरत असल्याचा आरोप
3

Mumbai News: वायुप्रदूषणावरून सदस्य प्रचंड आक्रमक! नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरत असल्याचा आरोप

Mumbai News: फटाक्यांचा आवाज मर्यादेत; विषारी रसायनांचा धोका! ‘ग्रीन क्रॅकर्स’च्या नावाखाली बंदी असलेल्या रसायनांचा वापर
4

Mumbai News: फटाक्यांचा आवाज मर्यादेत; विषारी रसायनांचा धोका! ‘ग्रीन क्रॅकर्स’च्या नावाखाली बंदी असलेल्या रसायनांचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.