प्रयागराज : प्रेयसीचे (Girlfriend) न्यूड फोटो (Nude Photos) तिच्या कुटुंबातील सदस्यांना पाठविणाऱ्या व्यक्तीला जामीन (Bail) देण्यास अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) नकार दिला आहे. हा पीडित तरुणीसोबत विश्वासघात झाला असल्याचे मत हायकोर्टाने व्यक्त केले आहे.
बलराम जायसवाल (Balram Jaiswal) या आरोपीच्या जामीन अर्जावर हे आदेश देण्यात आले आहेत. पीडित तरुणीने विश्वासाने हे फोटो काढण्याची आणि ठेवण्याची परावनगी या व्यक्तीला दिली होती. मात्र आरोपीने तिचा विश्वासघात करत, तिच्या पाठीत खंजीर खुपसला असे मत कोर्टाने नोंदवले आहे.
[read_also content=”दुसऱ्या मुलासोबत फोटोत पाहिली, पाच मिनिटांत केला प्रेयसीचा खून, व्हॅलेंटाईन डेच्या रात्री गळा दाबून केली प्रियकराने हत्या https://www.navarashtra.com/india/seen-in-a-photo-with-another-boy-murdered-girlfriend-in-five-minutes-strangled-by-boyfriend-on-valentines-day-night-nrvb-244468.html”]
या पीडित तरुणीने आरोपी बलराम याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यानुसार, हे दोघेही फेसबुकवरुन एकमेकांच्या संपर्कात आले, त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. बलरामसोबत शारिरिक संबंध ठेवल्याची माहितीही तरुणीने दिली आहे. त्यानंतर या मुलीचे न्यूड फोटो, व्हिडिओ बलरामने शूट केले. त्याच्या आधारे तो तिचे शोषण करु लागला. आरोपी या मुलीला धमकावत असे आणि आपत्तीजनक व्हॉट्सअप चॅट करीत असे.
हे फोटो घेतल्यापासून तो तिच्यावर जबरदस्ती करीत असे आणि तिला ब्लॅकमेलही करीत होता. हे फोटो, व्हिडिओ तिच्या कुटुंबियांना पाठवेल आणि सोशल मीडियावर पोस्ट करेन, अशा धमक्याही तो तिला देत होता.
[read_also content=”ब्युटी क्वीनने केली प्लास्टिक सर्जरी; त्याचे दुष्परिणाम असे झाले की… https://www.navarashtra.com/latest-news/viral-news-after-plastic-surgery-russian-beauty-queen-claims-she-was-unable-to-close-eyes-or-smile-nrvb-244446.html”]
काही काळानंतर आरोपी बलरामने हे फोटो, या पीडित मुलीच्या कुटुंबियांना पाठवले. तसेच हे फोटो सार्वजनिक करण्याची धमकीही दिली. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये आरोपीला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो जेलमध्येच आहे. हे सर्व तथ्य जाणून घेतल्यानंतर, कोर्टाने आरोपीला चांगलेच फटकारले आहे. पीडित तरुणीच्या प्रतिष्ठेचा त्याने अपमान केल्याचे मत कोर्टाने नोंदवले आहे.






