(Photo - X)
नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीने अभिजीत वंजारी यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, नितेश कराळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत सहा वर्षांसाठी हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे.
हकालपट्टीची माहिती माध्यमांमधून मिळाल्याचं सांगताना कराळे यांनी पक्षाच्या निर्णयाचा स्वीकार करत असल्याचं म्हटलं. मात्र, ही कारवाई चुकीची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Mumbai News : ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा एल्गार! SIR वरून मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक
“पक्षासाठी 110 सभा घेतल्या. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राज्यभर फिरून प्रचार केला. स्वतःच्या क्लासकडे दुर्लक्ष करून पक्षासाठी काम केलं,” असं कराळे यांनी सांगितलं.
पक्षासाठी इतकं काम करूनही आपल्यावर कारवाई झाल्याने ते भावुक झाल्याचं दिसून आलं. आता या संपूर्ण प्रकरणात मतदार काय निर्णय घेतात, याकडे त्यांचं लक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या कारवाईमागे काँग्रेसकडून पक्षावर दबाव टाकला जात असावा, अशी शंका कराळे यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांच्यातील लढतीमुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कराळे यांनी मतदारांवर विश्वास व्यक्त केला. पक्षाच्या निर्णयाबाबत आपली भूमिका मांडल्यानंतर आता जनता मतदानातून उत्तर देईल, असं ते म्हणाले.
दरम्यान, नितेश कराळेंच्या हकालपट्टीचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो आणि मतदार कोणाला कौल देतात, हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे.
Rohit Pawar PC: SIR – निवडणूक आयोगाचे कारनामे’ दाखवत रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा
Ans: नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने अभिजीत वंजारी यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतरही नितेश कराळे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाई केल्याचं वृत्त आहे.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
Ans: पक्षासाठी 110 सभा घेतल्याचं आणि विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यभर प्रचार केल्याचं त्यांनी सांगितलं. आता मतदानातून जनता उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.






