Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

President Murmu : एआय समाधान देऊ शकतं, पण योग्य प्रश्न विचारणं आपली जबाबदारी; राष्ट्रपती मुर्मू यांच मोठे भाष्य

President Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराजा सयाजीराव विद्यापाठीच्या दिक्षांत समारंभात उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मल्टीडिसिप्लिनरीचा उपयोग करण्याचे आवाहन केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 23, 2026 | 04:41 PM
President Murmu : एआय समाधान देऊ शकतं, पण योग्य प्रश्न विचारणं आपली जबाबदारी; राष्ट्रपती मुर्मू यांच मोठे भाष्य

President Murmu : एआय समाधान देऊ शकतं, पण योग्य प्रश्न विचारणं आपली जबाबदारी; राष्ट्रपती मुर्मू यांच मोठे भाष्य

Follow Us
Follow Us:
  • महाराजा सयाजीराव विद्यापीठात दिक्षांत समारंभ
  • राष्ट्रपतींकडून अनेक विषयांच्या एकत्रिकरणाचे आवाहन
  • 229 विद्यार्थ्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री
 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांनी बुधवारी उच्च शिक्षणात मल्टीडिसिप्लिनरी (अनेक विषयांचे एकत्रिकरण) चे उपयोग करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), गरिबी उन्मूलन आणि लोकशाहीसारख्या जटील समकालीन समस्यांचे समाधान एकाच क्षेत्रातून होऊ शकत नाही.

तसेच त्या विद्यार्थ्यांना म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) समाधान देऊ शकते, पण त्याला योग्य प्रश्न विचारणे आपली जबाबदारी आहे. टेक्नॉलॉजी वेगाने कार्य करते, पण तिचा वापर कोणत्या पद्धतीने करावा याचा विचार विद्यार्थ्यांना करायला हवा.

गुजरातच्या वडोदरामधील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या 75 व्या दिक्षांत समारंभाला संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, विद्यापीठात शिक्षणाचे अनेक विषय आहेत, जे ज्ञानाच्या विविध शाखांना एकत्रित आणण्याची परिस्थिती निर्माण करतात. त्या पुढे म्हणाल्या की, कला शाखेपासून विज्ञान शाखेपर्यंत, टेक्नॉलॉजी ते मेडिसिन, लॉ पासून ते सामाजिकशास्त्र, फाइन आर्ट्सपासून परफॉर्मिंग आर्ट्स, मॅनेजमेंटपासून ते पत्रकारितेपर्यंत हे विद्यापीठ ज्ञानाच्या अनेक क्षेत्रांमध्ये शिक्षण देत आहे.

अनेक विषयांचे ज्ञान गरजेचे

राष्ट्रपती म्हणाल्या की, समाजासमोर येणाऱ्या समस्या आता एकमेकांशी अधिक जोडलेल्या आहेत आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विषयांच्या ज्ञानाची आवश्यकता आहे. त्या पुढे म्हणाल्या की, हवामान बदल हा केवळ पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासाचा विषय नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा केवळ संगणकशास्त्राचा विषय नाही. आरोग्य हा केवळ वैद्यकशास्त्र किंवा वैद्यकीय विज्ञानाचा विषय नाही. गरिबी दूर करणे हा केवळ अर्थशास्त्रज्ञाचा विषय नाही. लोकशाही हा केवळ राज्यशास्त्राचा विषय नाही.
आता आपल्याला अनेक समस्यांचे समाधान शोधण्यासाठी अनेक विषयांना एकत्रित करून (मल्टीडिसिप्लिनरी) काम करण्याच्या दृष्टीकोनाची गरज असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी स्पष्ट केले.

‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका? ‘या’ दोन राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 75 किमीपर्यंत वाऱ्यांची शक्यता; शाळांना सुट्टी

दृष्टीकोन विकसित करणे गरजेचे

राष्ट्रपती म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आता फक्त आपल्या शिक्षणाच्या खास विषयापर्यंत मर्यादित न राहता विविध गोष्टींचे ज्ञान आणि आपला दृष्टीकोन विकसित करण्याची गरज आहे. आपल्याला एका वैज्ञानिकासारखी जिज्ञासा, एका कलाकारासारखी संवेदनशीलता, एका इतिहासकारासारखा दृष्टीकोन, अर्थशास्त्राप्रमाणे समज आणि समाजशास्त्राप्रमाणे चेतनेची गरज असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.

 

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

दरम्यान दिक्षांत समारंभात 229 विद्यार्थ्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री, 2,857 विद्यार्थ्यांना मास्टर डिग्री, 8,863 विद्यार्थ्यांना बॅचलर डिग्री आणि 657 विद्यार्थ्यांना पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमासाठी पात्र ठरवण्यात आले.

Web Title: President murmu todays problems need multidisciplinary approach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • ai
  • Draupadi Murmu
  • President

संबंधित बातम्या

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा
1

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
2

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन
3

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.