भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण, दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
मिळालेल्य माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी आदित्य बॅटमिंटन खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. पण तो बॅटमिंटन खेळून घरी परतलाच नाही. त्याचा फोनही बंद लागत होता. यानंतर तातडीने कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विजय शर्मा यांच्या मुलाला शोधण्यासाठी पथकांनी काम सुरू केले. पोलीस, अधिकारी आणि लष्कर या सर्वांचा यात सहभाग होता आणि विविध तर्कवितर्क सुरू झाले.
हिरानगरमधील एका खाजगी शाळेत शिकणारा आदित्य शर्मा, शाळा सुटल्यानंतर घरी परतला आणि त्या संध्याकाळी परिसरातील दुसऱ्या एका खाजगी शाळेत बॅटमिंटन खेळायला गेला होता. पण रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. अकादमीमध्ये फोन केल्यावर तो तिथे गेला नसल्याचे समजले. आदित्यच्या मित्रांनाही फोन करण्यात आले, पण त्याच्या मित्रांनाही त्याची माहिती नव्हती.
अनेक तास आदित्य कुठेच दिसत नसल्याने विजय शर्मा यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. पोलिसांनी कठुआ आणि जम्मूमध्ये शोधमोहीम सुरू केली आणि परिसरात हाय अलर्ट जारी केला. इयत्ता ११वीचा विद्यार्थी असलेल्या आदित्य कुमारला शोधण्यासाठी अनेक पोलीस पथके तयार करण्यात आली आणि त्यांनी वेगाने शोधमोहीम सुरू केली.
Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी, ‘या’ राज्यात युनियनचा आग्रह
सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आदित्य दुपारी ४:१५ च्या सुमारास त्याच्या मूळ गावी, हिरानगरहून जम्मूला जाणाऱ्या बसमध्ये चढताना शेवटचा दिसला होता. तो कुठे आहे हे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी चालक आणि वाहकाची चौकशी केली आहे. सूत्रांनुसार, तो शेवटचा दिसल्यापासून त्याच्या हालचालींचा माग काढण्यासाठी पोलीस पथकांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले.
बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि शहराबाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अखेर तपासादरम्यान तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला दिल्लीतून ताब्यात घेतले. विजय शर्मा हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी यापूर्वी कठुआमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि भाजपच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे राज्य सचिव म्हणून काम केले आहे. ते पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्यही आहेत.






