नवी दिल्ली – काल भारताच्या सीमेवर म्हणजे हिमाचल प्रदेशच्या सीमेवर चीनी सैनिक व भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाली.यानंतर विरोधक आक्रमक झाले असून, ‘गुजरातच्या निवडणुक होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहायला सांगितलं होतं?,’ असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशातील राजकारण्यांनी राजकारणाकडे किंवा निवडणुकांकडे कमी लक्ष देऊन देशाच्या ज्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. त्याकडे लक्ष द्यावे असा टोमणा भाजपाला लगावला आहे.
[read_also content=”‘चिन्हाच्या’ सुनावणीनंतर आता ‘सत्तासंघर्षा’वरील सुनावणी देखील पुढील वर्षातच…10 जानेवारीला होणार सत्तासंघर्षावर फैसला. आज कोर्टाने म्हटले… https://www.navarashtra.com/maharashtra/after-the-hearing-of-the-symbol-the-hearing-on-the-power-struggle-will-also-be-heard-next-year-353226.html”]
हल्ल्याचे पडसाद संसदेत
दरम्यान, चीनी हल्ल्याचे पडसाद आज संसदीय अधिवेशनात देखील उमटले. तवांग मुद्यावर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे, तर राज्यसभेतही विरोधक आक्रमक होत, भारत-चीन संघर्षाचे संसदेत पड़साद उमटले आहेत. पंतप्रधान मोदींच्या उत्तरासाठी विरोधक आक्रमक झाले असून, कमकुवत नेतृत्वाचा आरोप भाजपावर केला जात आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून, सभागृहात विरोधकांनी गदरोळ घालत संसदीय कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
दरम्यान, लडाख, डोकलाम, गलवाननंतर आता चीनी सैन्य तवांगमध्ये घुसलं आहे. लडाखमधून चीनी सैन्य बाहेर काढले चर्चा झाली, याचा बोलबाला झाला, पण आता चीनी सैनिक तवांगमध्ये घुसले आहेत. चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूंनी घुसतोय याकडे लक्ष द्यावे. तरच खऱ्या अर्थाने राष्ट्राची सेवा होईल,’ असा सल्लाही संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. ‘सरकार राजकारणामध्ये गुंतून पडले आहे, राजकारण व निवडणुका या महत्त्वाच्या वाटत आहेत, पण देशाच्या सीमाभाग हा देखील महत्त्वाचा आहे, याचा विसर पडल्याचा दिसतोय, असं राऊत म्हणाले.
देशाचे दुष्मन सीमेवर धडका मारताहेत. आणि सरकार याकडे गांभीर्यांने लक्ष देत नाही. देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? असा संशय संजय राऊत यांनी उपस्थित केला. तवांगची घटना शुक्रवारी झाली. नक्की सत्य काय आहे हे कळायला मार्ग नाही. या घटनेत नक्की किती सैनिक जखमी झालेत याची अधिकृत माहिती द्यायला सरकार तयार नाही. जे गलवान व्हॅलीसोबत झालं तेच आता होताना दिसतंय,’ असाही संशय संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.