Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचाच..; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून संजय राऊतांनी भाजपवर तोफ डागली

ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा अपमान केला, अशा व्यक्तीचा भाजप सन्मान करत आहे, अशी टीका राऊत यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून केली आहे. "महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2026 | 09:59 AM
‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचाच..; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून संजय राऊतांनी  भाजपवर तोफ डागली
Follow Us
Close
Follow Us:
  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा
  • महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार
  • कोश्यारी यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारावरून संजय राऊतांची भाजप सरकारवर टिका
 

 Sanjay Raut Criticized BJP Government:    प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, या निर्णयावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संजय राऊत यांनी ट्विटर एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत थेट   भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

” महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान! ” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. उद्या दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. (Sanjay Raut) 

भारतातील सर्वात जलद T20 अर्धशतक; अभिषेक शर्माने मोडला हार्दिक पंड्याचा विक्रम, इतिहास रचला!

 

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे २०१९ ते २०२३ या काळात कार्यरत होते. पण या पाच वर्षांत विविध विधानांमुळे आणि राजकीय घडामोडींमुळे त्यांची कारकिर्द कायमच वादग्रस्त राहिली. मुंबई, महाराष्ट्र, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरही वादग्रस्त विधाने केली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार असताना कोश्यारींवर ‘समांतर सरकार’ चालवत असल्याचाही आरोप झाला.

१. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने

भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जुन्या काळातील आदर्श’ असे संबोधले आणि त्यांची तुलना आधुनिक काळातील नेत्यांशी केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहाबद्दल टिप्पणी करताना त्यांचे हसणे आणि “लहान वयात मुले लग्नानंतर काय करत असतील?” असे विधान करणे अपमानकारक मानले गेले. “समर्थ रामदासांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?” असे विधान करून त्यांनी महाराजांच्या कर्तृत्वापेक्षा गुरुंचे स्थान मोठे असल्याचे सुचवल्याचा आरोप झाला.

Todays Gold-Silver Price: किंचीत घसरले सोन्याचे दर, चांदीही नरमली! खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

२. मुंबई आणि मराठी अस्मितेचा मुद्दा

महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढून टाकले, तर मुंबई महाराष्ट्राकडे पैसेच उरणार नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखच उरणार नाही,” असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.

३. राजकीय पेच आणि घटनात्मक वाद

पहाटेचा शपथविधी: २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट अचानक हटवून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पहाटे दिलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ अत्यंत वादग्रस्त ठरली.

४. राजकीय हस्तक्षेप

१२ आमदारांची नियुक्ती: महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीची फाईल त्यांनी प्रदीर्घ काळ प्रलंबित ठेवली, ज्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात सतत संघर्ष राहिला.

उद्धव ठाकरे सरकार कोसळताना आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर येताना घेतलेल्या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. या सातत्यपूर्ण वादांमुळेच विरोधकांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली होती, ज्याची परिणती अखेर फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या राजीनाम्यात झाली.

महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले
याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता!
महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते!
छान! pic.twitter.com/5xrZ0u6c9q
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2026

Web Title: Sanjay raut launched a sarcastic attack on the bjp over the awarding of the padma bhushan to bhagat singh koshyari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Republic  Day 2026  LIVE Updates:  रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रासाठी पद्मश्री 2026 जाहीर
1

Republic Day 2026 LIVE Updates: रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रासाठी पद्मश्री 2026 जाहीर

Maharashtra Politics: ‘मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू..’;  सहर शेख यांच्यानंतर इम्तियाज जलील यांचे विधान
2

Maharashtra Politics: ‘मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू..’; सहर शेख यांच्यानंतर इम्तियाज जलील यांचे विधान

Chandrapur News: सत्तासंघर्ष चिघळला! एकाला महापौर, दुसऱ्याला स्थायी समिती सभापती? धानोरकर–वडेट्टीवार वाद थेट दिल्ली दरबारी
3

Chandrapur News: सत्तासंघर्ष चिघळला! एकाला महापौर, दुसऱ्याला स्थायी समिती सभापती? धानोरकर–वडेट्टीवार वाद थेट दिल्ली दरबारी

‘आमचे नगरसेवक चोरीला गेले ओ चोरीला…’; कल्याण-डोंबिवलीतील पोलिस स्थानकात तक्रार दाखल
4

‘आमचे नगरसेवक चोरीला गेले ओ चोरीला…’; कल्याण-डोंबिवलीतील पोलिस स्थानकात तक्रार दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.